पश्चिम विदर्भातील धरणात ३९ टक्के जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 01:03 PM2018-07-24T13:03:45+5:302018-07-24T13:07:16+5:30

अकोला : पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेरी लावली असून, २३ जुलैपर्यंत पाच जिल्ह्यांत ३८.१९ टक्के जलसाठा संचयित झाला.

39 percent water supply in the dam in western Vidarbha! | पश्चिम विदर्भातील धरणात ३९ टक्के जलसाठा!

पश्चिम विदर्भातील धरणात ३९ टक्के जलसाठा!

Next
ठळक मुद्देअकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात आता कुठे ३३.१९ टक्के जलसाठा संकलित झाला आहे.बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा मोठ्या धरणातील जलसाठा संपला असून, अद्याप एक थेंबही वाढ झाली नाही. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ५०.३० टक्के, एकबुर्जी धरणात ८६.७२ टक्के, तर सोनल धरणात ३४.५७ टक्के जलसाठा आहे.

अकोला : पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेरी लावली असून, २३ जुलैपर्यंत पाच जिल्ह्यांत ३८.१९ टक्के जलसाठा संचयित झाला. पण, बुलडाणा जिल्ह्यात अद्याप अपेक्षित पाऊस झाला नसल्याने या जिल्ह्यातील तीन धरणाची जलपातळी शून्य टक्केच आहे. इतरही धरणातील जलसाठा अत्यल्पच आहे.
पश्चिम विदर्भात नऊ मोठे, २४ मध्यम, तर ४५२ लघू प्रकल्प आहेत. यात अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात आता कुठे ३३.१९ टक्के जलसाठा संकलित झाला आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात ३४.९० टक्के जलसाठा झाला आहे. उमा २९.०२, मोर्णा धरणात २०.३८ टक्के, तर वाण धरणात आतापर्यंत ५८.७४ टक्के जलसाठा संकलित झाला. यामध्ये मागीलवर्षीचा ४८ टक्के जलसाठा शिल्लक होता. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा मोठ्या धरणातील जलसाठा संपला असून, अद्याप एक थेंबही वाढ झाली नाही. याच जिल्ह्यातील मस व कोराडी मध्यम धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. तोेरणा ७.६०, तर उतावळी धरणातील पातळी १४ टक्के झाली आहे. याच जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १०.५३ टक्के, पेनटाकळी धरणात ४.५४ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १७.४८ टक्के, पलढगमध्ये १२.६५ टक्के, मन धरणात १५.४० टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ५०.३० टक्के, एकबुर्जी धरणात ८६.७२ टक्के, तर सोनल धरणात ३४.५७ टक्के जलसाठा आहे. 
अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा धरणात ४३.९२ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये ९०.५७, अरुणावती ३३.७२, तर बेंबळा धरणात ४०.६५ टक्केच जलसाठा आहे.

 

Web Title: 39 percent water supply in the dam in western Vidarbha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.