वऱ्हाडात ३९ टक्केच जलसाठा;  बुलडाणा जिल्ह्यातील चार सिंचन प्रकल्प शून्यावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 06:29 PM2018-07-31T18:29:51+5:302018-07-31T18:31:42+5:30

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांतील बहुतांश धरणात अल्प जलसाठा उपलब्ध असून, बुलडाणा जिल्ह्यातील चार धरणांची जलपातळी शून्य टक्केच आहे.

39% water stock in Varadha dams; Four irrigation projects in Buldhana district! | वऱ्हाडात ३९ टक्केच जलसाठा;  बुलडाणा जिल्ह्यातील चार सिंचन प्रकल्प शून्यावरच!

वऱ्हाडात ३९ टक्केच जलसाठा;  बुलडाणा जिल्ह्यातील चार सिंचन प्रकल्प शून्यावरच!

Next
ठळक मुद्दे काटेपूर्णा या मोठ्या धरणात आता कुठे ३६.४२ टक्के जलसाठा संकलित झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा मोठ्या धरणातील जलसाठा संपला.यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये ९५.५८, अरुणावती ३४.६४, तर बेंबळा धरणात ४२.६६ टक्केच जलसाठा आहे.

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांतील बहुतांश धरण अल्प जलसाठा उपलब्ध असून, बुलडाणा जिल्ह्यातील चार धरण जलपातळी शून्य टक्केच आहे. पाच जिल्ह्यांत आजमितीस ३९.९१ टक्केच जलसाठा उपलब्ध झाला. पावसाचे दोन महिने संपल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
पश्चिम विदर्भात नऊ मोठे, २४ मध्यम, तर ४५२ लघू प्रकल्प आहेत. यात अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात आता कुठे ३६.४२ टक्के जलसाठा संकलित झाला आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात ३८.८९ टक्के जलसाठा झाला आहे. उमा ३०.५७, मोर्णा धरणात २१.८३ टक्के, तर वाण धरणात आतापर्यंत ५६.०० टक्के जलसाठा संकलित झाला. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा मोठ्या धरणातील जलसाठा संपला असून, या धरणाची पातळी शून्य टक्केच आहे. याच जिल्ह्यातील मस व कोराडी मध्यम धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. तोेरणा धरणात केवळ ८.३७, तर उतावळी धरणातील पातळी १७.२३ टक्के झाली आहे. याच जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १०.३४ टक्के, पेनटाकळी धरणात ४.५४ टक्केच आहे. या धरणात एक थेंबही वाढ झाली नाही. ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १६.९२ टक्के, पलढगमध्ये १२.६५ टक्के, मन धरणात १५.९४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ६१.२८ टक्के, एकबुर्जी धरणात ९४.५७ टक्के, तर सोनल धरणात ४४.०३ टक्के जलसाठा आहे. अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा धरणात ४५.६२ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये ९५.५८, अरुणावती ३४.६४, तर बेंबळा धरणात ४२.६६ टक्केच जलसाठा आहे.

मोठ्या धरणात ४०.८० टक्के जलसाठा
पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत नऊ मोठे सिंचन प्रकल्प आहेत. यात आजमितीस ४०.८० टक्के जलसाठा आहे. मध्यम प्रकल्प २४ असून, त्यामध्ये ४२.०९ टक्के, तर ४६६ लघू प्रकल्पात ३७.३२ असा एकूण ३९.९१ टक्के जलसाठा आहे.

 

Web Title: 39% water stock in Varadha dams; Four irrigation projects in Buldhana district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.