३९८ उमेदवार अविरोध
By admin | Published: July 25, 2015 01:57 AM2015-07-25T01:57:15+5:302015-07-25T01:57:15+5:30
अकोला जिल्ह्यातील २२0 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी ३९0१ उमेदवार रिंगणात.
अकोला : जिल्ह्यातील २२0 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी (गुरुवारी) जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले. त्यामध्ये सातही तालुक्यात ३९८ उमेदवारांच्या अविरोध निवडीवर शुक्रवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. १ हजार ४८४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने, जिल्ह्यात ३ हजार ९0१ उमेदवार ग्रामपंचायतींच्या निवडणूक रिंगणात उरले आहेत. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये मुदत संपणार्या जिल्ह्यातील २२0 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आणि ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी ४ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकांसाठी २0 जुलैपर्यंत जिल्ह्यात एकूण ६ हजार २५९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी २१ जुलै रोजी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यायांमध्ये करण्यात आली. त्यामध्ये १५१ उमेदवारी अर्ज अपात्र ठरविण्यात आले, तर ६ हजार १0८ उमेदवारी अर्ज पात्र ठरविण्यात आले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत गुरुवार, २३ जुलै रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत होती. त्यामध्ये जिल्ह्यातील सातही तालुक्यात १ हजार ४८४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. दरम्यान, जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, तेल्हारा, पातूर व मूर्तिजापूर या सातही तालुक्यात विविध ग्रामपंचायतींच्या ३९८ जागांवर एकापेक्षा जास्त उमेदवारी अर्ज उपलब्ध झाले नसल्याने, ३९८ उमेदवारांच्या अविरोध निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. संबंधित उमेदवारांची ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाच्या दिवशी संबंधित तहसीलदार तथा निवडणूक अधिकार्यांकडून करण्यात येणार आहे. १ हजार ४८४ उमेदवारांनी निवडणुकीतून घेतलेली माघार आणि ३९८ उमेदवारांच्या अविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाल्याने, जिल्ह्यात ३ हजार ९0१ उमेदवार ग्रामपंचायतींच्या निवडणूक रिंगणात असल्याचे चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले.