४० कोटींची दुष्काळी मदत तालुका स्तरावर वितरित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 12:58 PM2019-02-02T12:58:24+5:302019-02-02T12:59:32+5:30

पहिल्या हप्त्यात प्राप्त झालेला ४० कोटी ७७ लाख ७ हजार ७२८ रुपयांचा मदतनिधी पाच तहसील कार्यालय स्तरावर वितरित.

 40 crore drought assistance distributed at taluka level! | ४० कोटींची दुष्काळी मदत तालुका स्तरावर वितरित!

४० कोटींची दुष्काळी मदत तालुका स्तरावर वितरित!

Next

अकोला : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकºयांच्या मदतीसाठी शासनामार्फत ८१ कोटी ५५ लाख ५ हजार ४५६ रुपयांचा मदतनिधी मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी पहिल्या हप्त्यात प्राप्त झालेला ४० कोटी ७७ लाख ७ हजार ७२८ रुपयांचा मदतनिधी पाच तहसील कार्यालय स्तरावर वितरित करण्यात येत असल्याचा आदेश प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी शुक्रवारी दिला. तहसील कार्यालयांमार्फत मदतीची रक्कम संबंधित दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी ८१ कोटी ५५ लाख ५ हजार ४५६ रुपयांचा मदतनिधी शासनामार्फत मंजूर करण्यात आला आहे. मंजूर करण्यात आलेल्या दुष्काळी मदतनिधीपैकी पहिल्या हप्त्यात जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाचही तालुक्यांतील शेतकºयांच्या मदतीसाठी ४० कोटी ७७ लाख ७ हजार ७२८ रुपयांचा मदतनिधी ३१ जानेवारी रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. दुष्काळी मदतीचा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील १ लाख ९४ हजार ७७४ शेतकºयांना लाभ होणार आहे. उपलब्ध मदतनिधी दुष्काळग्रस्त पाचही तालुक्यांच्या तहसील कार्यालयांना वितरित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी १ जानेवारी रोजी दिला. संबंधित तहसील कार्यालयांमार्फत मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

 

Web Title:  40 crore drought assistance distributed at taluka level!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.