गोवंशाचे ४0 किलो मांस जप्त
By admin | Published: March 18, 2017 02:31 AM2017-03-18T02:31:27+5:302017-03-18T02:31:27+5:30
आरोपीस अटक; उरळ पोलिसांची कारवाई
Next
उरळ (जि. अकोला), दि. १७- हातरुण येथील महात्मा गांधी विदयालयासमोरून गोमांसाची वाहतूक करणार्या आरोपीस उरळ पोलिसांनी १८ मार्च रोजी रंगेहात पकडले. यावेळी त्याच्याजवळून ४0 किलो गोवंशाचे मांस व मोटारसायकल जप्त करण्यात आली.
हातरूण येथील शे.मलंग शे. महंमद हा शुक्रवारी सकाळी त्याच्या मोटर सायकलवरून (एम.एच. ३0 ए.एस.२0३३ ) ४0 किलो गोवंश मांस विक्रीसाठी नेत होता. यावेळी उरळ पोलिसांनी त्याला अडवून रंगेहात पकडले. या कारवाईत त्यांनी त्याच्याकडून सहा हजार रुपये किंमतीचे गोवंश मांस व ३0 हजार रूपये किंमतीची मोटर सायकल जप्त केली. यावेळी गुन्हा दाखल करून आरोपी शे.मलंग शे.महंमद यास अटक करण्यात आली.