४० टक्के कापूस शेतकऱ्यांकडेच; दरात पुन्हा १०० रू पयांची घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:53 PM2019-03-04T12:53:30+5:302019-03-04T12:53:37+5:30
अकोला : यावर्षी कापसाचे उत्पादन बऱ्यापैकी झाल्याचे तज्ज्ञ व्यापाऱ्यांचे मत आहे ,आजमितीस देशात दोन कोटी २५ लाख गाठी कापसाची खरेदी झाली पंरतु अपेक्षीत दर मिळत नसल्याने ४० टक्के कापूस अद्याप शेतकºयांकडेच आहे.
अकोला : यावर्षी कापसाचे उत्पादन बऱ्यापैकी झाल्याचे तज्ज्ञ व्यापाऱ्यांचे मत आहे ,आजमितीस देशात दोन कोटी २५ लाख गाठी कापसाची खरेदी झाली पंरतु अपेक्षीत दर मिळत नसल्याने ४० टक्के कापूस अद्याप शेतकºयांकडेच आहे. चालू आठवड्यात पुन्हा प्रतिक्ंिवटल १०० रू पयांनी घट झाल्याने शेतकºयांची चिंता वाढली.
यावर्षी सुरू वातीला पावसाला विलंब झाला नंतर पावसाचा खंड पडला. पंरतु कापूस उत्पादन गतवर्षीच्या तुलनेत बºयापैकी देशात आजपर्यंत खरेदी झालेल्या कापसावरू न हे निष्कर्ष तज्ज्ञ व्यापाºयांनी काढले असून, यावर्षी तीन लाख पन्नास हजार गाठी कापसाचे उत्पादन होेण्याची शक्यताही वर्तविली आहे.त्या तुलनेत आतापर्यंत दोन लाख २५ हजार गाठी कापूस देशात खरेदी करण्यात आला. या राज्यात ५४ लाख गाठी कापसाची खरेदी झाली आहे.असे असले तरी देशात आणि राज्यात ४० टक्के कापूस शेतकºयांकडेच आहे. कापसाचे दर घटल्याने शेतकºयांनी कापूस विकला नसल्याचा त्यांचा अंदाज आहे. वेचणी हंगामाच्या सुरू वातीला कापसाचे प्रतिक्ंिवटल दर हे ६ हजार रू पये होते पण हे दर औटघटकेचेच ठरले.त्यांनतर कापसाच्या दरात घट सुरू झाली तेव्हापासून त्यामध्ये सुधारणा झाला नाही.प्रथम हे दर ५,५०० ते ५,७५० रू पयांपर्यंत घटले होते. आता यात पुन्हा घट झाली असून, प्रतिक्ंिवटल २,५० ते ३,५० रू पयांनी घट झाली.या दरात उत्पादन खर्चही निघणे कठीण असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, यापेक्षा दर घटले तर शेतकºयांनी शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस घेऊन यावा असे आवाहन महाराष्टÑ राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्यावतीने करण्यात आले आहे.
- देशात यावर्षी साडेतीन कोटी गाठी कापसाचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. आजपर्यंत खरेदी करण्यात आलेल्या कापसावरू न हा अंदाज आहे. दर कमी झाल्याने ४० टक्के कापूस शेतकºयांकडे आहे.
वसंत बाछुका,
कापूस उद्योजक,
अकोला.