जिल्हा बँकेचे ४१ हजार शेतकरी थकबाकीदार!

By admin | Published: June 27, 2017 10:17 AM2017-06-27T10:17:23+5:302017-06-27T10:17:23+5:30

दीड लाखाची कर्जमाफी; परिपत्रक न निघाल्याने बँका संभ्रमात

41 thousand farmers of the district bank are weird! | जिल्हा बँकेचे ४१ हजार शेतकरी थकबाकीदार!

जिल्हा बँकेचे ४१ हजार शेतकरी थकबाकीदार!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शासनाने दीड लाख रुपयांची कर्जमाफी केली आहे. तथापि, या संदर्भातील परिपत्रक बँकांपर्यंत पोहोचले नसल्याने बँका संभ्रमात आहेत. तीन दिवसांच्या शासकीय सुट्यांनतर मंगळवारी बँका उघडणार आहेत. शेतकऱ्यांना काय उत्तर द्यावे, हा प्रश्न बँकांपुढे आहे. दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ४१ हजार थकबाकीदार असून, जिल्हा बँकेने जास्त वेळ काम करू न शेतकऱ्यांना आवश्यक मदत करण्यात येणार आहे.
शेतकरी आंदोलनानंतर शासनाने जून महिन्याच्या सुरुवातीला कर्जमाफी जाहीर केली आहे. सुकाणू समिती व विरोधी पक्षातील नेत्यांच्या चर्चेनंतर सरकारने कर्जमाफीची मर्यादा एक लाखावरू न दीड लाख रुपयांपर्यंत केली आहे. कर्जफेड परत करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ हजार अनुदान देण्यात येणार आहे.
दरम्यान, जिल्हा बँकेचे २ लाख १८ हजार शेतकरी सभासद आहेत. ३० जून २०१६ पर्यंत यातील ४१ हजार शेतकरी थकबाकीदार आहेत. उर्वरित शेतकऱ्यांचे २०१३-१४ पुनर्गठन झाले असल्याचे सांगण्यात येत असून, त्यांची कर्ज परतफेड सुरू आहे. यातील ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची रक्कम हप्त्यांनी परत केली आहे, त्यांना यावर्षी पीक कर्ज देण्यात येत आहे; परंतु शासनाने कर्जमाफीची मर्यादा दीड लाखापर्यंत केल्याने ४१ हजार शेतकऱ्यांमधील किती शेतकरी दीड लाखाच्या आत व वर आहेत हे बघण्याचे काम बँक करीत आहे. कर्जमाफी ही ३० जून २०१६ पर्यंत आहे; परंतु ज्या शेतकऱ्यांनी ३० जून रोजी किंवा त्यानंतर कर्ज परतफेड केली असेल त्या शेतकऱ्यांना दीड लाख कर्जमाफीचा दिलासा मिळणार की नाही, याची स्पष्टता नाही. त्यासाठी शासनाचे यासंदर्भातील परिपत्रक निघाल्यानंतरच समजणार असल्याने बँकांचे अधिकारी या विषयावर बोलण्याचे टाळत आहेत. अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे जे ४१ हजारावर थकबाकी शेतकरी आहेत, यातील काही दीड लाखाच्या आत तर काही वर आहेत. या सर्वांची नव्याने आकडेवारी काढली जाणार आहे.

तीन दिवसानंतर बँक उघडणार असल्याने त्या दृष्टीने आम्ही तयारी केली आहे. जास्त वेळ काम करू न शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. जिल्हा बँकेचे ४१ हजारावर थकबाकीदार आहेत; परंतु अद्याप परिपत्रक न आल्याने यावर बोलणे संयुक्तित ठरणार नाही.
- अनंत वैद्य,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अकोला.

Web Title: 41 thousand farmers of the district bank are weird!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.