४१७५ उमेदवार रिंगणात

By admin | Published: July 24, 2015 11:59 PM2015-07-24T23:59:40+5:302015-07-24T23:59:40+5:30

अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुक रिंगणातून १४८४ उमेदवारांची माघार.

4175 candidates in the fray | ४१७५ उमेदवार रिंगणात

४१७५ उमेदवार रिंगणात

Next

अकोला : जिल्ह्यातील २२0 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी गुरुवारी जिल्हय़ात १ हजार ४८४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने, सातही तालुक्यात ४ हजार १७५ उमेदवार ग्रामपंचायतींच्या निवडणूक रिंगणात उतरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये मुदत संपणार्‍या जिल्ह्यातील २२0 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आणि ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी ४ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकांसाठी २0 जुलैपर्यंत जिल्ह्यात एकूण ६ हजार २५९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी २१ जुलै रोजी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांमध्ये करण्यात आली. त्यामध्ये १५१ उमेदवारी अर्ज अपात्र ठरविण्यात आले, तर उर्वरित ६ हजार १0८ उमेदवारी अर्ज पात्र ठरविण्यात आले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत गुरुवार, २३ जुलै रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत होती. त्यामध्ये जिल्ह्यातील सातही तालुक्यात १ हजार ४८४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. संबंधित उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने, जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ४ हजार १७५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे चित्र स्पष्ट झाले.

Web Title: 4175 candidates in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.