४२ परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी अमरावती, औरंगाबाद व नागपूर विभागात नियुक्ती

By admin | Published: May 18, 2014 07:56 PM2014-05-18T19:56:47+5:302014-05-18T21:51:17+5:30

अमरावती, औरंगाबाद व नागपूर विभागात ४२ परिविक्षाधीन उपजिल्हाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

42 appointed deputy collector in Amravati, Aurangabad and Nagpur division | ४२ परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी अमरावती, औरंगाबाद व नागपूर विभागात नियुक्ती

४२ परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी अमरावती, औरंगाबाद व नागपूर विभागात नियुक्ती

Next

अकोला : राज्य शासनामार्फत ४२ परिविक्षाधीन उपजिल्हाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावती, औरंगाबाद व नागपूर या तीन विभागात परिविक्षाधीन उपजिल्हाधिकार्‍यांची जिल्हानिहाय नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसेवा (मुख्य) परीक्षा २०१२ अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी संवर्गातील पदावर नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आलेल्या ४२ उमेदवारांची परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून राज्य शासनामार्फत नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल व वन विभागाच्या गत २१ एप्रिल रोजीच्या आदेशानुसार राज्यातील अमरावती, औरंगाबाद आणि नागपूर या तीन महसूल विभागात एकूण ४२ परिविक्षाधीन उपजिल्हाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये अमरावती विभागात १४, औरंगाबाद विभागात १४ आणि नागपूर विभागात १४ परिविक्षाधीन उपजिल्हाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागनिहाय नियुक्ती करण्यात आलेल्या परिविक्षाधीन उपजिल्हाधिकार्‍यांची जिल्हानिहाय नियुुक्ती संबंधित विभाागीय आयुक्तांमार्फत नुकतीच करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित जिल्ह्यांमध्ये परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी रुजू झाले आहेत.

विभागनिहाय परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी!
विभाग               संख्या
अमरावती             १४
औरंगाबाद            १४
नागपूर                १४

एकूण                  ४२

*दोन वर्ष विभागीय आयुक्तांच्या नियंत्रणाखाली!
परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या उमेदवारांना परिविक्षाधीन कालावधीत दोन वर्ष संबंधित विभागीय आयुक्तांच्या नियंत्रणाखाली काम करावे लागणार आहे. परिविक्षाधीन कालावधीतील एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, त्यांना प्रथम वेतनवाढ देण्याची अनुमती देण्यात येणार आहे. दोन वर्षांचा परिविक्षाधीन कालावधी समाधानकारक पूर्ण केल्यावर त्यांना दुसरी वेतनवाढ मिळणार आहे.

*अकोला जिल्ह्यात तीन परिविक्षाधीन अधिकारी रुजू!
अमरावती विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार, अकोला जिल्ह्यात चार परिविक्षाधीन उपजिल्हाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यापैकी तीन परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाले आहेत. त्यामध्ये बाळासाहेब तिडके, डॉ.सचिन खल्लाळ व डॉ.शरद जावळे यांचा समावेश आहे. तर डॉ.गणेश पोटे अद्याप रुजू झाले नसल्याचे चित्र आहे.

Web Title: 42 appointed deputy collector in Amravati, Aurangabad and Nagpur division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.