उत्तर प्रदेशातील ४२७ मजूर गावाकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 05:07 PM2020-05-09T17:07:49+5:302020-05-09T17:08:23+5:30
४२७ आश्रित मजुरांना शनिवारी अकोल्यातील बस स्थानक येथून उत्तर प्रदेशातील गोंड जिल्ह्यात त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आले.
अकोला :'लॉकडाऊन' मध्ये जिल्ह्यात अडकलेल्या उत्तर प्रदेशातील ४२७ आश्रित मजुरांना शनिवारी अकोल्यातील बस स्थानक येथून उत्तर प्रदेशातील गोंड जिल्ह्यात त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आले.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनामार्फत लागू करण्यात आलेल्या 'लॉकडाऊन ' मध्ये विविध राज्यातील मजूर अकोला जिल्ह्यात अडकले होते. या आश्रित मजुरांच्या निवास व भोजनाची व्यवस्था जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली होती. दीड महिन्याच्या कालावधीनंतर जिल्ह्यातील आश्रित मजुरांना त्यांच्या गावाकडे पाठविण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये ९ मे रोजी उत्तर प्रदेशातील ४२७ आश्रित मजुरांना अकोल्यातील बस स्थानक येथून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसद्वारे अमरावतीकडे रवाना करण्यात आले. सायंकाळी ६ वाजता अमरावती येथून या मजुरांना विशेष श्रमिक रेल्वेगाडीने उत्तर प्रदेशातील गोंड जिल्ह्यात त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे , अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार , उपजिल्हाधिकारी (रोहयो ) बाबासाहेब गाढवे , तहसीलदार विजय लोखंडे , नायब तहसीलदार विजय खेडकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते .
१६ बसेसद्वारे पाठविले अमरावतीकडे !
उत्तर प्रदेशातील जिल्'ातील आश्रित ४२७ मजुरांना गोंड जिल्'ातील त्यांच्या गावाकडे पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत राज्य परिवहन महामंडळाच्या १६ बसेसद्वारे मजुरांना शनिवारी दुपारी १२.३० वाजता अकोला बस स्थानकावरून अमरावतीकडे रवाना करण्यात आले. तेथून विशेष गणित रेल्वेगाडीने सायंकाळी या मजुरांना त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आले.