राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघात ३ वाजता पर्यंत ४३.०१ टक्के मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 04:08 PM2024-04-26T16:08:25+5:302024-04-26T16:09:23+5:30
वाशिम, बुलढाणा, वर्धा ,नांदेड, परभणी व हिंगोली या आठ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
राजरत्न सिरसाट
अकोला: लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजता पासून सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजता पर्यंत राज्यातील एकूण आठ लोकसभा मतदारसंघात लोकसभा मतदारसंघात ४३.०१ टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजता पासून सुरुवात झाली असून, दुपारच्या उन्हाचा तडाका पाहता मतदारांनी सकाळपासूनच मतदारसंघावर रांगा लावायला सुरुवात केली . ११ वाजेपर्यंत सर्वच मतदार संघाची रांगच रांग होती. त्यामुळे अकरा वाजता पर्यंत
१८ .८३ टक्के मतदान झाले होते . दुपारी तीन वाजता मतदानाची टक्केवारी ४३.०१ पर्यंत पोहोचली .दुसऱ्या टप्प्यामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ
वाशिम, बुलढाणा, वर्धा ,नांदेड, परभणी व हिंगोली या आठ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तिसऱ्या चरणात दुपारी ३ वाजता पर्यंत अकोला लोकसभा मतदारसंघात ४२.६९ टक्के मतदान झाले असून, अमरावती लोकसभा मतदारसंघात ४३.७६ टक्के, यवतमाळ- वाशिम मतदार संघात ४२.५५ टक्के, बुलढाणा लोकसभा मतदारसंघात ४१.६६ टक्के, वर्धा लोकसभा मतदारसंघात ४५.९५ टक्के ,नांदेड लोकसभा मतदारसंघात ४२.४२, परभणी लोकसभा मतदारसंघात ३३.८८तर परभणी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक ४४ .४९ टक्के मतदान झाले आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघाचाही मतदानाचा टक्का वाढला आहे . नांदेड लोकसभा मतदारसंघात ३ वाजता पर्यंत ४२.४२ टक्के मतदान झाले आहे.
या आठ लोकसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.३३ टक्के मतदान झाले होते. दुपारी एक वाजता ही टक्केवारी ३१ .७७ वर पोहोचली होती.
पश्चिम विदर्भातील चार लोकसभा मतदारसंघात सकाळी २२ वाजता पर्यंत मतदानाला वेग आला होता परंतु तापमान वाढल्याने संख्या मतदारांची संख्या थोडी रोडावली असली तरी दुपारी चार नंतर मतदारांचा वाढेल.