निवडणुकीच्या धामधुमीत ४.३६ लाखांची दारू जप्त
By admin | Published: October 9, 2014 01:09 AM2014-10-09T01:09:48+5:302014-10-09T01:09:48+5:30
२ लाखाची गावठी दारू नष्ट, राज्य उत्पादन शुल्क विभाग सतर्क.
अकोला : निवडणुकीच्या धामधुमीत आठवडाभरामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध ठिकाणी छापे घालून, ४ लाख ३६ हजार रुपयांची दारू जप्त केली. तसेच २ लाख रुपयांची गावठी दारू विभागाने नष्ट केली. निवडणुकीचे वातावरण असल्याने जिल्हय़ात दारूची आवक वाढली आहे. शहरांमधील हॉटेल, वाईनाबारसह गावांमध्ये देशी-विदेशी दारूचे वितरण होत असल्याचे चित्र आहे. यामध्ये गावठी दारूचीही मागणी मोठी आहे; परंतु या सर्व घडामोडींवर राज्य उत्पादन शुल्क विभाग वॉच ठेवून आहे. निवडणूक विभागाच्या भरारी पथकांमार्फतसुद्धा दारूच्या वाहतुकीवर लक्ष ठेवले जात आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देशी व विदेशी दारू विक्रेत्यांकडून दररोज अहवाल मागविण्यात येत आहे.