कुरणखेड येथे ४४ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:21 AM2021-03-01T04:21:18+5:302021-03-01T04:21:18+5:30
कुरणखेड : जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुरणखेड येथील सर्व व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यासाठी शुक्रवारी, ग्रामपंचायत कार्यालयात कोरोना स्वॅब ...
कुरणखेड : जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुरणखेड येथील सर्व व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यासाठी शुक्रवारी, ग्रामपंचायत कार्यालयात कोरोना स्वॅब तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण १४१ व्यावसायिकांनी तपासणी केली. यापैकी तब्बत ४४ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुरणखेड येथे आढळलेल्या रुग्णांमध्ये २१ ते ३० वर्ष वयोगटांतील व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. कोरोना चाचणी शिबिरात १४१ जणांची तपासणी करण्यात आली. याचे अहवाल शनिवारी प्राप्त झाल्यानंतर ४४ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. आरोग्य विभागामार्फत गावात भेट दिली असून, नागरिकांना दक्ष राहण्याचा सल्ला दिला आहे. (फोटो)
कुरणखेड येथे ४४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. गावात नऊ पथकामार्फत सर्वेक्षण सुरू आहे. रुग्णांना होमक्वारंटाइन करण्यात आले असून, आरोग्य विभागामार्फत वॉच ठेवण्यात येत आहेत.
- डॉ. प्रिया सानप, प्राथमिक आरोग्य केंद्र, कुरणखेड