बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हवे ४५ कोटी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 02:31 PM2018-09-05T14:31:49+5:302018-09-05T14:39:25+5:30
अकोला : जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकºयांना मदत वाटपाच्या तिसºया हप्त्यापोटी ४५ कोटी १७ लाख ७४ हजार रुपयांच्या निधीची गरज आहे.
अकोला : जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकºयांना मदत वाटपाच्या तिसºया हप्त्यापोटी ४५ कोटी १७ लाख ७४ हजार रुपयांच्या निधीची गरज आहे. त्यानुषंगाने निधी मागणीचा प्रस्ताव १ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाºयांमार्फत अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला.
गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे संकटात सापडलेल्या बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकºयांसाठी शासनामार्फत मदत जाहीर करण्यात आली होती. जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकºयांच्या मदतीसाठी १३५ कोटी ५१ लाख ७४ हजार रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे करण्यात आली होती. शासन निर्णयानुसार बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकºयांना तीन हप्त्यात मदतीचे वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार मदत वाटपाचा पहिला व दुसरा हप्ता मिळून गत जून अखेरपर्यंत जिल्ह्यासाठी ९० कोटी ३४ लाख रुपयांचा मदत निधी शासनामार्फत प्राप्त झाला. उपलब्ध मदत बोंडअळीग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. उर्वरित तिसºया व अंतिम हप्त्यातील मदत जिल्ह्यातील उर्वरित बोंडअळीग्रस्त शेतकºयांना वाटप करण्यासाठी ४५ कोटी १७ लाख ७४ हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने बोडअळीग्रस्त शेतकºयांना मदत वाटपासाठी निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्यामार्फत विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.
मदतीची शेतकºयांना प्रतीक्षा!
जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकºयांच्या मदतीसाठी १३५ कोटी ५१ लाख ७४ हजार रुपयांची मागणी असून, त्यापैकी मदत वाटपाच्या पहिल्या व दुसºया हप्त्यात शासनामार्फत ९० कोटी ३४ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. उपलब्ध मदत निधी जिल्ह्यातील संबंधित शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आला असून, उर्वरित तिसºया हप्त्याचा ४५ कोटी १७ लाख ७४ हजार रुपयांचा मदत निधी केव्हा प्राप्त होणार आणि मदतीचा प्रत्यक्षात लाभ केव्हा मिळणार, याबाबत बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.