बसमध्ये सापडलेले ४५०० रूपये केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 01:17 PM2017-10-03T13:17:27+5:302017-10-03T13:17:27+5:30
चिखली आगारातील वाहक जी. आर. इंगळे व चालक व्ही. व्ही. कोल्हे यांना बसमध्ये आढळलेले पाकिट व ४५०० हजार रूपये संबंधित व्यक्तीला परत करण्यात आले.
देऊळगाव मही: चिखली आगारातील वाहक जी. आर. इंगळे व चालक व्ही. व्ही. कोल्हे यांना बसमध्ये आढळलेले पाकिट व ४५०० हजार रूपये संबंधित व्यक्तीला परत करण्यात आले.
चिखली ते पुणे रातरानी बसमध्ये कर्तव्यावर असताना जी. आर. इंगळे व व्ही. व्ही. कोल्हे यांना दिग्रस येथील माजी पंचायत समिती सभापती अरविंद पाटिल पºहाड यांचे पाकिट व त्यामध्ये ४५०० हजार रूपये सापडले. तसेच अन्य कागदपत्रे मिळून आली. जी आर इंगले यांनी त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून चिखली आगारात बसस्थानक प्रमुख जोगदंड यांच्या हस्ते सदर पाकिट सुपूर्द केले. या प्रसंगी आगारातील कामगार संघटनेचे आगार सचिव राम नवले, भारत सुरडकर, भोलाने व सुरेश भवर व कामगार उपस्थित होते.