५.४० लाख वृक्ष लागवडीसाठी ४.५७ लाख खड्डे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:52 PM2020-08-03T17:52:51+5:302020-08-03T17:52:59+5:30

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून वृक्ष लागवडीसाठी ४ लाख ५७ हजार १२० खड्डे करण्यात आले असून, १ जुलैपासून वृक्ष लागवड सुरू करण्यात आली आहे.

4.57 lakh pits for planting 5.40 lakh trees! | ५.४० लाख वृक्ष लागवडीसाठी ४.५७ लाख खड्डे!

५.४० लाख वृक्ष लागवडीसाठी ४.५७ लाख खड्डे!

googlenewsNext

अकोला : वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र योजनेंतर्गत यावर्षी जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींमार्फत ५ लाख ४० हजार ३५० वृक्ष लागवड करण्याचे नियोजन जिल्हा परिषदमार्फत निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून वृक्ष लागवडीसाठी ४ लाख ५७ हजार १२० खड्डे करण्यात आले असून, ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात १ जुलैपासून वृक्ष लागवड सुरू करण्यात आली आहे.
वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र योजनेंतर्गत २०२० या वर्षात जिल्ह्यात वृक्ष लागवडीचे नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील सातही तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायतींकडून १ हजार १० वृक्ष लागवडप्रमाणे ५३५ ग्रामपंचायती अंतर्गत ५ लाख ४० हजार ३५० वृक्ष लागवड करण्याचे नियोजन जिल्हा परिषदमार्फत निश्चित करण्यात आले आहे. ग्रामपंचायतींकडून जिल्ह्यात वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने ३० जुलैपर्यंत ग्रामपंचायतींकडून ४ लाख ५७ हजार १२० खड्डे तयार करण्यात आले आहेत. तयार केलेला खड्ड्यांमध्ये ग्रामपंचायतीमार्फत वृक्ष लागवड करण्याचे कामदेखील सुरू करण्यात आले आहे.

Web Title: 4.57 lakh pits for planting 5.40 lakh trees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.