४६ हजारांवर शेतकर्यांनी काढला पीक विमा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:10 AM2017-08-03T02:10:00+5:302017-08-03T02:10:44+5:30
अकोला : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गत ३१ जुलैपर्यंत जिल्हय़ात ४६ हजार शेतकर्यांनी पीक विमा काढण्यासाठी ‘ऑनलाइन’अर्ज भरले आहेत. शासनाकडून देण्यात आलेल्या मुदतवाढीनुसार पीक विमा काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत ४ ऑगस्टपर्यंत आहे. त्यामुळे जिल्हय़ातील शेतकर्यांना पीक विमा काढण्यासाठी आता केवळ दोन दिवसांचा कालावधी उरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गत ३१ जुलैपर्यंत जिल्हय़ात ४६ हजार शेतकर्यांनी पीक विमा काढण्यासाठी ‘ऑनलाइन’अर्ज भरले आहेत. शासनाकडून देण्यात आलेल्या मुदतवाढीनुसार पीक विमा काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत ४ ऑगस्टपर्यंत आहे. त्यामुळे जिल्हय़ातील शेतकर्यांना पीक विमा काढण्यासाठी आता केवळ दोन दिवसांचा कालावधी उरला आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढण्यासाठी शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज आणि विमा हप्त्याची रक्कम बँकांमध्ये जमा करण्याची मुदत गत ३१ जुलैपर्यंत होती. त्यानुसार जिल्हय़ात पीक विमा काढण्यासाठी जिल्हय़ात गत ३१ जुलैपर्यंत ४६ हजार शेतकर्यांनी ऑनलाइन अर्ज भरले. दरम्यान, पीक विमा योजनेंतर्गत विमा काढण्यासाठी शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज आणि विमा हप्त्याची रक्कम स्वीकारण्यास ४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाच्या कृषी खात्यामार्फत १ ऑगस्ट रोजी घेण्यात आला. त्यानुसार बिगर कर्जदार शेतकरी ४ ऑगस्टपर्यंत पीक विमा काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करू शकतील. पीक विमा काढण्यासाठी आता केवळ दोन दिवसांचा कालावधी उरला असल्याने पीक विमा काढण्यासाठी अर्ज भरणे आणि विमा हप्त्याची रक्कम जमा करण्यासाठी शेतकर्यांना धावपळ करावी लागत आहे.
सेतू केंद्रांवर भरले जाणार अर्ज!
पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढणार्या शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज आणि विमा हप्त्याची रक्कम गत ३१ जुलैपर्यंत बँकांमध्ये स्वीकारण्यात आली; मात्र पीक विमा काढण्यास देण्यात आलेल्या मुदतवाढीच्या शासन निर्णयानुसार पीक विमा काढणार्या बिगर कर्जदार शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज आता बँकांमध्ये भरले जाणार नसून, केवळ महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र व कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) इत्यादी सेतू केंद्रांवर भरण्यात येणार आहेत. विमा हप्त्याची रक्कमदेखील सेतू केंद्रांवर स्वीकारण्यात येणार आहे, तसेच राष्ट्रीय कृषी विमा कंपनीच्या संकेतस्थळावरदेखील शेतकर्यांना विमा काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरता येणार असून, नेट बँकिंगद्वारे विमा हप्त्याची रक्कम भरता येणार आहे.
पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढण्यासाठी गत ३१ जुलैपर्यंत जिल्हय़ात जवळपास ४६ हजार शेतकर्यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. शासन निर्णयानुसार पीक विमा काढण्यासाठी ४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
- रवींद्र निकम,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.