हरभऱ्याला ४६७५ रुपये दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:19 AM2021-07-28T04:19:48+5:302021-07-28T04:19:48+5:30

बसस्थानकात सॅनिटायझर मशीन आवश्यक अकोला : गत दीड वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावाने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. निर्बंध शिथिल ...

4675 per gram | हरभऱ्याला ४६७५ रुपये दर

हरभऱ्याला ४६७५ रुपये दर

Next

बसस्थानकात सॅनिटायझर मशीन आवश्यक

अकोला : गत दीड वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावाने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. निर्बंध शिथिल झाल्याने येथील आगार क्रमांक २ मध्ये गर्दी वाढली आहे. त्यामुळे येथे सॅनिटायझर मशीन बसविण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

तुरीच्या पिकांचे मोठे नुकसान!

अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तुरीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तुरीची केवळ १०-१५ दिवसांआधीच पेरणी झाली होते. नुकतेच अंकुरलेल्या पिकांना या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे.

तुरळक ठिकाणी पाऊस

अकोला : जिल्ह्यात गत दोन-तीन दिवसांपासून तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहे. सोमवारी दिवसभर व मंगळवारी सकाळपर्यंत २.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. जिल्ह्यात आतापर्यंत ३८३.९ मिमी पाऊस झाला.

प्रकल्पांच्या साठ्यात वाढ!

अकोला : जिल्ह्यात काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. काटेपूर्णा प्रकल्पात ६६.११, वान ५०.२६, मोर्णा ४८.३८, निर्गुणा ६५.१६ टक्के साठा आहे.

३४५० हेक्टर जमीन खरडली!

अकोला : जिल्ह्यात बुधवारी, गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये अकोला तालुक्यात सर्वाधिक ३ हजार ४५० हेक्टर जमीन खरडून गेली आहे.

ड्रॅगन फ्रुटला मागणी

अकोला : गत काही वर्षांपासून शहरातील बाजार पेठेत ड्रॅगन फ्रुटची विक्री वाढली आहे. हे फळ आरोग्यदायी असल्याने ग्राहकांकडूनही मागणी होत आहे. याला ८० रुपये प्रती फळ दर मिळत आहे.

वारंवार वाहतुकीचा खोळंबा

अकोला : शहरातील वाटीका चौक ते शिवणी रस्ता नव्याने तयार करण्यात येत आहे. काही ठिकाणी हा रस्ता एकाबाजूने खोदल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. तसेच या रस्त्याने धुळीचे प्रमाणही वाढले आहे.

Web Title: 4675 per gram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.