अकोट शहरात ४७, तर ग्रामीण भागात ...मंडळाने केली गणरायाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:23 AM2021-09-12T04:23:51+5:302021-09-12T04:23:51+5:30
अकोट: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता शासनाने गणेशोत्सवाच्या काळात दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळणार असल्याची हमी देत, अकोट शहरात ४७ ...
अकोट: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता शासनाने गणेशोत्सवाच्या काळात दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळणार असल्याची हमी देत, अकोट शहरात ४७ तर ग्रामीण भागात ....... सार्वजनिक मंडळाने गणेश मूर्तीची स्थापना केली, तर दरम्यान हा उत्सव शांतता व एकोप्याने पार पडावा, याकरिता पोलीस प्रशासन नागरिकांचे सहकार्य घेत सज्ज आहे.
अकोट शहरात पेशवेकालीन व टिळकांनी भेट दिलेले गणरायाचा उत्सव आनंदाने साजरा होतो. ठिकठिकाणी ऐतिहासिक गणेश मंदिर आहेत, शिवाय हा उत्सव शहरातील सार्वजनिक मंडळ लोकसहभागातून दहा दिवस पार पाडतात. या वर्षी कोरोनाचे नियमात शिथिलता आल्यानंतर, शहरात ४७ गणेश मंडळाने हा उत्सव साजरा करीत गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. शहर पोलीस स्टेशनमध्ये पार पडलेल्या शांतता समितीची बैठकीत जिपोअ जी.श्रीधर यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन केले आहे, शिवाय शासनाने नव्या आदेशानुसार मंडपात भाविकांना प्रत्यक्ष दर्शनाकरिता येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. केवळ ऑनलाइन, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दर्शन उपलब्ध करून द्यावे, असे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याबाबत सूचना मंडळाना दिल्याचे शहर पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी सांगितले.
--------------
...असा आहे पोलीस बंदोबस्त
गणेशोत्सव शांतता पार पाळावा, यासाठी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा गुन्हे शाखेचे अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी, एक आरसीपी तुकडी, एक एसआरपीएफ तुकडी, लोहमार्ग बंदोबस्त, स्थानिक व मुख्यालय येथील पोलीस कर्मचारी, होमगार्ड असा बंदोबस्त आहे.
--------------------------
१६ गावांत ‘एक गाव, एक गणपती’
अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनअंतर्गत १६ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ असा सार्वजनिक उत्सव साजरा करण्यात येत आहे. ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी गावागावात गणेशभक्त, पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्ती समिती अध्यक्ष यांच्या भेटी घेऊन कोरोनाचे काळात गावकऱ्यांनी आरोग्याची काळजी घेत, ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्न केले. ग्रामीण भागात....... गावात सार्वजनिक मंडळ आहेत. बहुतांश गावात सार्वजनिक गणेश मंडळाने शासनाच्या नियमांचे पालन करीत, आमचे गाव आमची जबाबदारी अशी हमी देत, पोलीस प्रशासनाला सहकार्य करीत असल्याचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी सांगितले.