खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ४८ पैसे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:26 AM2017-11-01T01:26:26+5:302017-11-01T01:29:12+5:30
अकोला : जिल्हय़ातील लागवडीयोग्य ९९0 गावांमधील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी जाहीर केली. त्यानुसार जिल्हय़ातील खरीप पिकांची सुधारित सरासरी पैसेवारी ४८ पैसे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हय़ातील लागवडीयोग्य ९९0 गावांमधील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी जाहीर केली. त्यानुसार जिल्हय़ातील खरीप पिकांची सुधारित सरासरी पैसेवारी ४८ पैसे आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने जिल्हय़ात मूग, उडिदाचे उत्पादन बुडाले. सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट झाली असून, कपाशीच्या उत्पादनाचेही काही खरे नाही. खरीप िपकाच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याने शेतकरी संकटात सा पडला आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी ३१ ऑक्टोबर रोजी जिल्हय़ातील अकोला, अकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांतील लागवडीयोग्य ९९0 गावांमधील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जाहीर केली. त्यानुसार जिल्हय़ातील लागवडीयोग्य सर्व ९९0 गावांमधील खरीप पिकांची सुधारित सरासरी पैसेवारी ४८ पैसे म्हणजेच ५0 पैशांपेक्षा कमी जिल्हय़ाची पैसेवारी आहे. यापूर्वी जिल्हा प्रशासनामार्फत गत ३१ सप्टेंबर रोजी जिल्हय़ातील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी पैसेवारी ६१ पैसे जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर प्रत्यक्ष खरीप पिकांचे उत्पादन लक्षात घेता, जिल्हय़ातील तहसीलदारांकडून प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे जिल्हय़ातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ४८ पैसे जाहीर करण्यात आली.