पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांपोटी ४९ लाख वितरित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 12:59 PM2019-02-06T12:59:55+5:302019-02-06T13:00:01+5:30
अकोला : जिल्ह्यातील दुष्काळी भागातील नळ पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांच्या पाच टक्के रक्कम आणि नोव्हेंबर महिन्याच्या चालू वीज देयकापोटी ४९ लाख ३१ हजार ४१२ रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २ फेबु्रवारी रोजी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाला वितरित करण्यात आला.
अकोला : जिल्ह्यातील दुष्काळी भागातील नळ पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांच्या पाच टक्के रक्कम आणि नोव्हेंबर महिन्याच्या चालू वीज देयकापोटी ४९ लाख ३१ हजार ४१२ रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २ फेबु्रवारी रोजी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाला वितरित करण्यात आला.
राज्यात दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या क्षेत्रातील ग्रामीण आणि नागरी भागातील ज्या पाणी पुरवठा योजना थकीत विद्युत देयकांची रक्कम भरली नसल्याने बंद आहेत, तसेच या पाणी पुरवठा योजना सुरू केल्यानंतर लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होऊ शकतो, अशा पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांच्या मुद्दलपैकी पाच टक्के रक्कम शासनामार्फत टंचाई निधीतून उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या ग्रामीण आणि नागरी भागातील पाणी पुरवठा योजनांच्या नोव्हेंबर २०१८ ते जून २०१९ या आठ महिन्यांच्या कालावधीतील वीज देयकांचा खर्च भागविण्यासाठी टंचाई निधीतून निधी वितरित करण्यास १७ जानेवारीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांसह अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार महसूल मंडळातील दुष्काळग्रस्त भागातील ५१५ नळ पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांच्या पाच टक्के रकमेसह नोव्हेंबर महिन्याच्या वीज देयकापोटी ४९ लाख ३१ हजार ४१२ रुपयांचा निधी टंचाई निधीतून उपलब्ध करून देण्याची मागणी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यामार्फत जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. त्यानुषंगाने महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाला टंचाई निधीतून ४९ लाख ३१ हजार ४१२ रुपयांचा निधी वितरित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला.