अकाेला जिल्ह्यात ४९७ गावांनी वेशीवरच रोखला काेराेना! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 11:15 AM2020-10-19T11:15:37+5:302020-10-19T11:18:18+5:30

497 villages in Akola district blocked CoronaVirus केवळ ८६ गावांमध्येच काेराेनाचे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

497 villages in Akola district blocked CoronaVirus at the gates! | अकाेला जिल्ह्यात ४९७ गावांनी वेशीवरच रोखला काेराेना! 

अकाेला जिल्ह्यात ४९७ गावांनी वेशीवरच रोखला काेराेना! 

Next
ठळक मुद्देसद्यस्थितीत केवळ ८६ गावांमध्येच काेराेनाचे रुग्ण ऑक्टाेबर महिन्याची सुरुवात अकोलेकरांना दिलासा देणारी ठरली आहे.

अकाेला : काेराेनाचे संक्रमण वाढतेच असले तरी सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत काेराेनाचा वेग मंदावला आहे. ग्रामीण भागात काेराेनाचा प्रसारही संथ गतीने हाेते असून जिल्ह्यातील ४९७ गावांनी काेराेनाला गावात प्रवेश करण्यापासून राेखण्यात यश मिळवले आहे. जिल्हा आराेग्य विभागाकडे असलेल्या माहितीवरून सद्यस्थतीत केवळ ८६ गावांमध्येच काेराेनाचे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. ऑक्टाेबर महिन्याची सुरुवात अकोलेकरांना दिलासा देणारी ठरली आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच एकूण चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह येणाºया रुग्णांची संख्या कमी झाली असून, बरे होणाºया रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून रुग्णसंख्या वाढीमध्ये चढ-उतार होत असले, तरी मृत्यूचा आलेख कायमच आहे. सप्टेंबर महिन्यात दिवसाला सरासरी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मृत्यूचे हेच सत्र ऑक्टाेबर महिन्यातही कायमच आहे. ग्रामीण भागात मात्र आता काेराेनाचे रुग्ण कमी हाेताना दिसत आहेत. संक्रमणाचा वेग मंदावला असला तरी ग्रामस्थांनी हलगर्जी केल्यास संक्रमण झपाट्याने हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवाळी-दसरा सणांमध्येही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन आवश्यक असल्याचे आराेग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

Web Title: 497 villages in Akola district blocked CoronaVirus at the gates!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.