५० टक्के बालके आहारापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 10:20 AM2020-05-05T10:20:10+5:302020-05-05T10:20:16+5:30

अंगणवाडी परिसरातील सर्वेक्षण केलेल्या ५० टक्क्यांपेक्षाही अधिक बालके पोषण आहारापासून वंचित असल्याची माहिती आहे.

 50% of children are deprived of food | ५० टक्के बालके आहारापासून वंचित

५० टक्के बालके आहारापासून वंचित

Next

- सदानंद सिरसाट 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : केवळ शासकीय अंगणवाड्यांमध्ये शिकत असलेल्या बालकांनाच पोषण आहार दिला जात असल्याने अंगणवाडी परिसरातील सर्वेक्षण केलेल्या ५० टक्क्यांपेक्षाही अधिक बालके पोषण आहारापासून वंचित असल्याची माहिती आहे. खासगी कॉन्व्हेंट, शाळांमध्ये जाणाऱ्या बालकांनाही पोषण आहार दिला जावा, अशी मागणी सातत्याने होत असतानाही शासनाकडून हेतूपुरस्पर दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार घडत आहे. दरम्यान, मार्च-एप्रिल दोन महिन्यांसाठी अंगणवाड्यांमध्ये बालकांना दिला जाणारा पोषण आहाराचा पुरवठाही ३० एप्रिल रोजी म्हणजे, ४२ दिवस उशिराने झाल्याचेही समोर आले आहे. विशेष म्हणजे, बालकांकडे आधी असलेला पोषण आहार १८ मार्च रोजीच संपला होता. इतके दिवस बालकांना पोषणापासूनही वंचित ठेवण्यात आले आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे २३ मार्च रोजी लॉकडाउन करण्यात आले. त्यापूर्वी म्हणजे,१८ मार्च रोजीच बालकांना आधी पुरवठा केलेला आहार संपुष्टात आला होता. त्यावेळी आहार पुरवठा होणे आवश्यक होते. ही बाब महिला व बालकल्याण विभागाच्या वरिष्ठांनाही सांगण्यात आली; मात्र लॉकडाउन आहे, वाहनांना परवानगी नाही, या कारणाने पोषण आहार पुरवठ्याला तब्बल ४२ दिवस उशीर झाला आहे. त्यातही शहरातील काही भागात अद्याप पुरवठाच झालेला नाही. ऐन लॉकडाउनच्या काळात पोषण आहार नसल्याने शहरासह ग्रामीण भागातील बालकांना त्यापासून वंचित राहावे लागले आहे. आता पुढील दोन महिन्यांसाठी पोषण आहार पुरवठ्यासाठीची मागणी महिला व बालकल्याण विभागाकडून केली जात आहे. त्यानुसार मे व जून महिन्याच्या धान्याचा पुरवठा होऊ शकतो.


आहार वाटपाची ठरलेली पद्धत
शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेतून तीन ते सहा वर्षांच्या बालकांना प्रती दिन, प्रती लाभार्थी ८ रुपये खर्च करून ५०० किलो कॅलरीज उष्मांक असणाºया पाककृती-१ मध्ये गहू, मसूर डाळ, मिरची, हळदी, मीठ, सोयाबीन तेल, चवळी हे सर्व मिळून एकूण-१४२ ग्रॅम प्रतिदिन द्यावे लागते. त्याचे एकत्रित वाटप करताना ५० दिवसांसाठी ७ किलो १०० ग्रॅम धान्य द्यावे लागते. तर पाककृती-२ मध्ये सर्व घटकातील दोन कडधान्य वगळून मूग डाळ, मटकी हे धान्य देत दैनंदिन १४० ग्रॅम धान्य असे ५० दिवसांसाठी ६ किलो ९५० ग्रॅम द्यावे लागते.


सर्वच तालुक्यात लवकरच पुरवठा!
लॉकडाउनमुळे अंगणवाड्या बंद झाल्या. त्यानंतर बालकांना गरम, ताजा आहार देणे अशक्य झाले. त्याऐवजी घरीच कच्चे धान्य पुरवठा करण्यासाठी कंझ्युमर्स फेडरेशनला २३ मार्च रोजी आदेश दिला. त्यानुसार २० एप्रिलपासून पुरवठा सुरू झाला. सर्वच तालुक्यांमध्ये लवकरच पूर्ण होईल.
- विलास मरसाळे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, जि.प.

Web Title:  50% of children are deprived of food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला