९०० वस्त्यांमध्ये ५० कोटींच्या विकासकामांचा प्रस्ताव पाठविणार जिल्हाधिकाऱ्यांकडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:17 AM2021-03-15T04:17:54+5:302021-03-15T04:17:54+5:30
अकोला : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती सुधारणा (दलित वस्ती सुधारणा) योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३५० गावांमधील ९०० वस्त्यांमध्ये ५० ...
अकोला : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती सुधारणा (दलित वस्ती सुधारणा) योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३५० गावांमधील ९०० वस्त्यांमध्ये ५० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा प्रस्ताव जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत दोन दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती सुधारणा योजनेेअंतर्गत जिल्ह्यातील ३५० गावांमध्ये ९०० वस्त्यांमध्ये करावयाच्या विकासकामांचे नियोजन जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे. शासनामार्फत मंजूर ५० कोटी रुपयांच्या निधीतून ९०० वस्त्यांमध्ये विकासकामे करण्यात येणार आहेत. त्यामध्ये सामाजिक सभागृह, रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा आदी विकासकामांचा समावेश आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांकडून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे विकासकामांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, विकासकामांच्या प्रस्तावांतील त्रुटींची दुरुस्ती करण्याचे काम सद्यस्थितीत जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत सुरू आहे. त्रुटींची दुरुस्ती करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील ३५० गावांमधील ९०० वस्त्यांमध्ये करावयाच्या ५० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा प्रस्ताव जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत मंगळवार, १६ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्ती सुधारणा योजनेेअंतर्गत जिल्ह्यातील ३५० गावांमधील ९०० वस्त्यांमध्ये ५० कोटी रुपयांच्या निधीतून विकासकामे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या विकासकामांचा प्रस्ताव लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.
आकाश शिरसाट
सभापती, समाजकल्याण, जिल्हा परिषद