राज्यात पुढच्या वर्षी ५0 कोटी वृक्ष लावणार!

By admin | Published: January 29, 2017 02:39 AM2017-01-29T02:39:29+5:302017-01-29T02:39:29+5:30

हरित सेनेची नोंदणी जोरात, नोंदणीत अकोला तिस-या क्रमांकावर.

50 crore trees will be planted next year in the state! | राज्यात पुढच्या वर्षी ५0 कोटी वृक्ष लावणार!

राज्यात पुढच्या वर्षी ५0 कोटी वृक्ष लावणार!

Next

अकोला, दि. २८-पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी ३३ टक्के वनांची गरज आहे; पण अलीकडे वनक्षेत्र कमी झाले असून, त्यांची पूर्तता करण्यासाठी शासनाने वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. पुढच्या वर्षी राज्यात ५0 कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यासाठी हरित सेना (ग्रीन आर्मी) तयार करण्यात येत आहे. त्यासाठीची नोंदणी राज्यात सुरू आहे. अहमदनगर, नाशिक, यवतमाळनंतर अकोल्याचा नोंदणीत तिसरा क्रमांक आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित चार दिवसीय राज्यस्तरीय वसंत कृषी प्रदर्शनात वन्यजीव, सामाजिक वनीकरण व वन विभागाच्यावतीने दालन उघडण्यात आले आहे. या दालनात हरित सेनेची नोंदणी करण्यात येत असून, शनिवारी एकाच दिवशी ५६0 नागरिक, शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे. या नोंदणीनंतर प्रत्येक सदस्याला किमान दहा वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट देण्यात येत आहे. या सदस्याला प्रधान मुख्य वनसंरक्षकांचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. हरित सेनेचे सदस्य झालेल्या सदस्याने वृक्ष लागवड, संवर्धनासह इतरांना वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहन द्यायचे आहे.
राज्यात यासाठीची नोंदणी सुरू आहे. राज्यात अहमदनगर व नाशिक प्रथम क्रमांकावर असून, यवतमाळ द्वितीय तर अकोला नोंदणीत तिसर्‍या क्रमाकांवर आहे.
अकोला जिल्हय़ात वन्यजीव, वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाला आठ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे, तर वन विभागाला एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

ग्रीन आर्मी सदस्यास सवलत!
हरित सेना (ग्रीन आर्मी) सदस्यास वन विभागाचे इको टुरिझम, सर्किट हाऊस, जंगल सफारीसाठीच्या सफारी गाड्यामध्ये विशेष सवलत मिळणार आहे.

हरित सेनेची नोंदणी सुरू झाली असून, अहमदनगर, नाशिक, यवतमाळनंतर या नोंदणीत अकोला तिसर्‍या क्रमाकांवर आहे. वनक्षेत्र वाढविण्यासोबतच गावागावांत वृक्ष लागवड व्हावी, हा यामागील उद्देश आहे.
गोविंद पांडे,
प्रसिद्धिप्रमुख, वन विभाग तथा वन्यजीव प्रमुख, अकोला.

Web Title: 50 crore trees will be planted next year in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.