न्यू तापडियानगर रेल्वे उड्डाणपुलासाठी ५0 कोटी
By admin | Published: March 11, 2016 03:01 AM2016-03-11T03:01:18+5:302016-03-11T03:01:18+5:30
केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मंजुरी, खासदार व आमदारांच्या प्रयत्नांना यश.
अकोला: शहरासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या न्यू तापडियानगर रेल्वे उड्डाणपुलाकरिता केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत ५0 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. खा. संजय धोत्रे आणि आ. रणधीर सावरकर यांनी या उड्डाणपुलाकरिता केलेल्या पाठपुराव्यामुळे शहरातील हे विकासकाम मार्गी लागले आहे.
अकोला येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या चौपदरीकरणाचा व अकोला शहरातील उड्डाणपुलाचा भूमिपूजन समारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडला होता. या कार्यक्रमात ना. गडकरी यांच्याकडे आ. सावरकर यांनी न्यू तापडियानगर व खरपमधील नागरिकांची अडचण लक्षात घेऊन रेल्वे उड्डाणपुलाची मागणी केली होती. लोकांची होणारी गैरसोय लक्षात घेता, या उड्डाणपुलाची आवश्यकता बघून गडकरी यांनी केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत ५0 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.