५0 मुख्य रस्त्यांच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 01:46 AM2017-08-18T01:46:44+5:302017-08-18T01:47:40+5:30

अकोला : शहराच्या विविध भागांमध्ये मुख्य रस्त्यांवर एलईडी पथदिवे लावण्याचे काम वेगात सुरू झाले असून, रस्त्यांवर लख्खं उजेड निर्माण झाल्याचे समाधानकारक चित्र दिसून येत आहे. आगामी सणासुदीचे दिवस पाहता पथदिव्यांच्या कामाचा निपटारा करण्यासाठी महापालिका सरसावल्याचे दिसून येते. 

50 main road speed | ५0 मुख्य रस्त्यांच्या कामाला वेग

५0 मुख्य रस्त्यांच्या कामाला वेग

Next
ठळक मुद्देशहरात एलईडीचा लख्ख उजेडमुख्य मार्ग उजळले!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहराच्या विविध भागांमध्ये मुख्य रस्त्यांवर एलईडी पथदिवे लावण्याचे काम वेगात सुरू झाले असून, रस्त्यांवर लख्खं उजेड निर्माण झाल्याचे समाधानकारक चित्र दिसून येत आहे. आगामी सणासुदीचे दिवस पाहता पथदिव्यांच्या कामाचा निपटारा करण्यासाठी महापालिका सरसावल्याचे दिसून येते. 
शहराच्या मुख्य मार्गांवरील सोडियम पथदिव्यांऐवजी सीएफएल पथदिवे बसवण्याचा निर्णय २00६ मध्ये महापालिकेने घेतला होता. याकरिता एशियन नामक कंपनीसोबत २0१३ पर्यंत करारनामा करण्यात आला. परंतु देयक थकीत राहत असल्यामुळे पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची सबब पुढे करीत कंपनीने देखभाल दुरुस्तीसाठी आखडता हात घेतला. शिवाय अंधूक उजेडामुळे अकोलेकरांमध्ये तीव्र नाराजीचा सूर होता. 
ही बाब ध्यानात घेता महापालिकेने लख्खं प्रकाश देणारे एलईडी पथदिवे लावण्याचा निर्णय घेतला. यासाठी आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांनी पुढाकार घेत शासनाकडून १0 कोटींचा निधी खेचून आणला. त्यामध्ये मनपा प्रशासनाने चौदाव्या वित्त आयोगातून १0 कोटींची तरतूद करीत एकूण २0 कोटी रुपयांतून एलईडी पथदिव्यांसाठी निविदा प्रक्रिया राबवली. प्रशासनाने नियुक्त केलेल्या कंपनीची संथ गती पाहता लोकप्रतिनिधींनी कंपनीचे कान टोचताच पथदिवे लावण्याच्या कामाला वेगाने सुरुवात झाल्याचे दिसून येते. 

३0 कोटींतून केवळ एलईडीची कामे!
शहराच्या विविध भागात लख्ख उजेड देणारे एलईडी पथदिवे उभारण्यासाठी २0 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. प्रशासनाने २0 कोटींच्या कामाचा कंत्राट दिला असतानाच आता नव्याने १0 कोटींच्या निधीसाठी आ. गोवर्धन शर्मा यांनी शासनाकडे पत्रव्यवहार केला. 
मुख्यमंत्र्यांनी सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानातून पथदिव्यांसाठी १0 कोटींचा निधी मंजूर केला आहे. एकूणच शहरात पहिल्यांदाच ३0 कोटी रुपयांतून केवळ एलईडी पथदिव्यांची कामे होतील, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

५0 रस्ते, ११७  चौकांमध्ये उजेड!
२0 कोटी रुपयांतून शहरातील प्रमुख ५0 रस्त्यांसह तब्बल ११७ चौकांमध्ये ‘एलईडी’ पथदिवे उभारल्या जात आहेत. या कामासाठी प्रशासनाने मे. रॉयल पॉवर टर्नकी इम्प्लिमेंट्स प्रा.लि. पुणे कंपनीची नेमणूक केली आहे.
मागील तीन दिवसांत जुने शहरातील श्रीवास्तव चौक ते कस्तुरबा गांधी रुग्णालय  रस्ता, अशोक वाटिका ते सवरेपचार रुग्णालय, नेहरू पार्क ते महापारेषण कार्यालय या तीन प्रमुख रस्त्यांवर पथदिवे लावण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त प्रभागांमध्ये मोठय़ा प्रमाणात एलईडी पथदिव्यांची कामे सुरू असल्याचे चित्र आहे.
-

Web Title: 50 main road speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.