पणनने थकवले शेतकऱ्यांचे ५०० कोटींचे चुकारे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 05:27 PM2020-06-08T17:27:27+5:302020-06-08T17:27:37+5:30

पणन महासंघाने यावर्षी ४ हजार कोटी रुपयांचा कापूस खरेदी केला आहे; परंतु पैसा नसल्याने शेतकऱ्यांचे ५०० कोटी रुपयांचे चुकारे थकवले आहेत.

500 crore pending of cotton grower farmer by marketing fedration | पणनने थकवले शेतकऱ्यांचे ५०० कोटींचे चुकारे!

पणनने थकवले शेतकऱ्यांचे ५०० कोटींचे चुकारे!

Next

अकोला : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाने यावर्षी ४ हजार कोटी रुपयांचा कापूस खरेदी केला आहे; परंतु पैसा नसल्याने शेतकऱ्यांचे ५०० कोटी रुपयांचे चुकारे थकवले आहेत. सोमवारी पणन महासंघाच्या मुख्य कार्यालयाचे ८० कोटी रुपये दिले असून, ८० कोटी रुपये चुकºयापोटी शेतकऱ्यांना वितरित करण्यात येत आहे.
पणन महासंघाने या वर्षी विक्रमी ७२ लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे. या पोटी शेतकºयांना ४ हजार कोटी रुपयांचे चुकारे करायचे होते. आतापर्यंत यातील ३.५० कोटींचे चुकारे करण्यात आले आहेत. पणन महासंघाकडे पैसे नसल्याने मे महिन्यात अकराशे कोटी रुपयांचे कर्ज बँकेकडून घेतले होते. यातूनही चुकारे करण्यात आले. उर्वरित रक्कम ही पणन महासंघाच्या खर्च, वाहतूक, जिनिंग इतर कारणासाठी ठेवण्यात आले आहेत.
पणन महासंघाचे राज्यात आजमितीस ८१ च्या वर खरेदी केंद्रे सुरू आहेत. यावर्षीच्या हंगामात पणन महासंघाने ७२ लाख क्विंटलवर कापूस खरेदी केला आहे. शेतकºयांचे चुकारे करण्यासाठी २,३०० कोटी रुपये कर्ज घेतले होते; परंतु शेतकºयांना ४ हजार कोटी रुपयांचे चुकारे करायचे होते. त्यातील ३,५०० कोटी रुपयांवर चुकारे अदा करण्यात आले आहेत. यासाठी पणन महासंघाने दुसºयांदा बँकेकडून १ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले.

Web Title: 500 crore pending of cotton grower farmer by marketing fedration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.