रामगावातून ५०० किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:19 AM2021-04-04T04:19:28+5:302021-04-04T04:19:28+5:30
पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई अकोला : बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामगाव येथे मोठ्या प्रमाणात गांजा विक्री सुरू ...
पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई
अकोला : बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामगाव येथे मोठ्या प्रमाणात गांजा विक्री सुरू असल्याच्या माहितीवरून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने छापा टाकून सुमारे ५०० किलो गांजा जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी रात्री उशिरा करण्यात आली. या प्रकरणी विक्रेताविरुद्ध बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामगाव येथील रहिवासी बाबाराव गणपत इंगळे त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात गांजा विक्री करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून पाटील यांनी पथकासह छापा टाकून त्याच्या घरातून सुमारे ५०० किलो गांजा जप्त केला. या आरोपींविरुद्ध बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गत काही दिवसांपासून विशेष पथकाकडून गांजाच्या मोठ्या कारवाया करण्यात येत आहेत. जळगाव खान्देशमधून आणण्यात आलेला गांजाचा साठा विशेष पथकाने बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जप्त केला होता. यासोबतच अकोट फाइल परिसरातूनही गांजा साठा जप्त करण्यात आला आहे.