अकोला जिल्हा व सत्र न्यायालयातून ५० हजारांचे संगणक चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 02:21 PM2020-03-16T14:21:05+5:302020-03-16T14:21:33+5:30
रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
अकोला: जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात असलेल्या जुन्या इमारतीमधील कक्ष क्रमांक ५१ मधून ५० हजार रुपये किमतीचे संगणक अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
जिल्हा व सत्र न्यायालयाचे सहायक अधीक्षक दिनेश जनार्दन अलकरी यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांनी न्यायालयाच्या जुन्या इमारतीमधील कक्ष क्रमांक ५१ चा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश क ेला. त्यानंतर या कक्षातील मॉनिटर, यूपीएस पळविला. या संगणकाची किंमत सुमारे ५० हजार रुपये असून, ही चोरी उघडकीस येताच रामदासपेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. त्यानंतर ठसे तज्ज्ञ आणि डॉग युनिटला पाचारण करून चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला. डॉग युनिट जिल्हा व सत्र न्यायालयातून रेल्वे स्टेशनपर्यंत गेले; मात्र त्यानंतर चोरट्यांचा सुगावा लागला नाही.