सैलानी यात्रेसाठी अकोला जिल्ह्यातून ५१ विशेष बस

By Atul.jaiswal | Published: March 20, 2024 02:46 PM2024-03-20T14:46:59+5:302024-03-20T14:47:15+5:30

राज्यातील विविध भागातून भाविक पिंपळगाव सराई येथे जातात.

51 special bus from Akola district for sightseeing | सैलानी यात्रेसाठी अकोला जिल्ह्यातून ५१ विशेष बस

सैलानी यात्रेसाठी अकोला जिल्ह्यातून ५१ विशेष बस

 
अकोला : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील हाजी अब्दुल रहमान (बाबा सैलानी) यांचा वार्षिक उर्स ३० मार्च रोजी उत्साहात साजरा होणार असून, या निमित्त दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) अकोला विभागाने शनिवार, २३ मार्चपासून विशेष बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अकोला जिल्ह्यातील पाच आगारांमधून येत्या ४ एप्रिलपर्यंत सैलानी यात्रेसाठी ५१ बस सोडण्यात येणार आहेत.होळीनंतर बाबा सैलानी यांचा उर्स प्रारंभ होतो. राज्यातील विविध भागातून भाविक पिंपळगाव सराई येथे जातात.

सैलानी यात्रेला जाण्यासाठी अकोला जिल्ह्यातील भाविक एसटी बसला प्राधान्य देतात. ही बाब लक्षात घेता महामंडळाने विशेष बस चालविण्याचे नियोजन केले आहे. अकोला विभागाने अकोला व वाशिम जिल्ह्यातील एकूण नऊ आगारांमधून सैलानी यात्रेसाठी १०० बसेसेची व्यवस्था केली आहे. सहा कर्मचऱ्यांचे एक पथक पिंपळगाव सराई येथे तैनात ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यात्रा विशेष गाड्यांमधून महामंडळाला चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

कोणत्या आगारातून किती बसेस
आगार - बस संख्या
अकोला क्र. १ - १५
अकोला क्र. २ - १८
अकोट - ०९
तेल्हारा - ०५
मुर्तिजापुर - ०४

Web Title: 51 special bus from Akola district for sightseeing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला