२४९ सदस्यांसाठी ५१ हजार २१२ मतदार बजावणार मताधिकार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:16 AM2020-12-26T04:16:10+5:302020-12-26T04:16:10+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पारद गावातील तीन प्रभागातून सात सदस्य उभे राहणार असून, १०८५ मतदार आहेत. भटोरी येथे तीन प्रभागातून नऊ ...
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पारद गावातील तीन प्रभागातून सात सदस्य उभे राहणार असून, १०८५ मतदार आहेत. भटोरी येथे तीन प्रभागातून नऊ सदस्य रिंगणात उभे राहणार असून, १,६९१ मतदार मताधिकार बजावणार आहेत. मंगरुळ कांबे येथील तीन प्रभागात नऊ सदस्य, गोरेगाव येथे तीन प्रभागात नऊ सदस्य, लाखपुरी येथे ४ प्रभागासाठी ११ सदस्य, सिरसो येथे ५ प्रभागात तेरा सदस्य, दुर्गवाडा येथे तीन प्रभाग असून, सदस्यसंख्या सात आहे. सांगवी येथे तीन प्रभागात सात सदस्य, टिपटाळा येथे तीन प्रभागात सात सदस्य, हिरपूर येथे ४ प्रभागात अकरा सदस्यसंख्या आहे. तसेच कवळा खोलापूर तीन प्रभागात सात सदस्य, सोनोनी (बपोरी) येथे तीन प्रभागांसाठी सात सदस्य, बपोरी येथे तीन प्रभागासाठी सात सदस्य, कुरूम येथे पाच प्रभागासाठी पंधरा सदस्य, माटोडा येथे तीन प्रभागासाठी सात सदस्य, कवठा सोपीनाथ येथे ३ प्रभागात सात सदस्य, धामोरी बु. येथे तीन प्रभागासाठी सात सदस्य, कार्ली येथे तीन प्रभागासाठी सात सदस्य, राजुरा घाटे येथे तीन प्रभागात सात सदस्य, खांदला येथे तीन प्रभागासाठी सात सदस्य, कंझरा येथे तीन प्रभागात नऊ सदस्य, अनभोरा येथे तीन प्रभागात नऊ सदस्य, जामठी बु. येथे चार प्रभागात अकरा सदस्य, हातगाव येथे पाच प्रभागात १३ सदस्य, चिखली येथे तीन प्रभागात नऊ सदस्य रिंगणात उभे आहेत. यामध्ये सर्वात मोठी ग्रामपंचायत कुरूम असून, येथे १५ सदस्य रिंगणात उभे आहेत; परंतु मतदार म्हणून मोठी ग्रामपंचयत हातगाव आहे. हातगावचे मतदान ५,८२६ आहे, तर कुरूमचे मतदान ५,४७३ आहे. तसेच खांदला ही ग्रामपंचायत सर्वात लहान असून, या ठिकाणी केवळ ४३७ मतदार आहे.