अकोट रेल्वे मार्गावर होणार लवकरच ५२ पुलांचे काम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 02:19 AM2017-11-20T02:19:27+5:302017-11-20T02:21:29+5:30
अकोला-पूर्णा रेल्वे मार्गाच्या धर्तीवर अकोला-अकोट रेल्वे मार्गावर २७ अंडरब्रिज आणि २५ लहान पूल बांधण्याच्या निर्मितीला गती दिली जात आहे. दक्षिण मध्य रेल्वे अधिकार्यांनी या कामकाजाचा आढावा घेतला. ब्रॉडगेजच्या कामाला सुरुवात करण्याआधी प्रवाशांची आणि शेतकरी व नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी तातडीने अंडरब्रिज तयार करा, असे निर्देश अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला-पूर्णा रेल्वे मार्गाच्या धर्तीवर अकोला-अकोट रेल्वे मार्गावर २७ अंडरब्रिज आणि २५ लहान पूल बांधण्याच्या निर्मितीला गती दिली जात आहे. दक्षिण मध्य रेल्वे अधिकार्यांनी या कामकाजाचा आढावा घेतला. ब्रॉडगेजच्या कामाला सुरुवात करण्याआधी प्रवाशांची आणि शेतकरी व नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी तातडीने अंडरब्रिज तयार करा, असे निर्देश अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी दिले. त्यांनी रेल्वे अधिकार्यांशी याबाबत संवाद साधला. अकोला-पूर्णा रेल्वे मार्गात खा. संजयभाऊ धोत्रे यांच्या सूचनेनुसार ५८ अंडरब्रिज तयार करण्यात आले होते. सहा महिने आधी हा रेल्वे मार्ग आरंभ झाला होता. याच धर्तीवर अकोला-अकोट रेल्वे मार्गावर २७ अंडरब्रिज व २५ लहान-मोठे पूल निर्माण होत आहेत. यासाठी अकोला पूर्व मतदारसंघातील आमदार रणधीर सावरकर आणि खासदार संजय धोत्रे यांनी पुढाकार घेतला. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, पंजाब, दिल्ली, हरियाणा, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांशी थेट संपर्क होऊन शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. अकोला बुलडाणा जिल्हय़ाला लाभ होणार आहे. ४२ कि.मी.चा हा रेल्वे मार्ग मार्च २0१९ च्या आधी पूर्ण करण्याच्या दिशेने अंडरब्रिजमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासाठी रेल्वे अधिकार्यांनी आढावा घेण्यास सुरुवात केली. यावेळी रेल्वे विभागाचे अभियंता श्रीवास्तव, नागपुरे, नाग पुश्प, भास्कर रेड्डी, दयाकर राव, प्रभाकर तरकांडे, सी. रेड्डी, वसिमोद्दिन, आशिष निकम, सोळंके, विष्णू पाटील, बळूभाऊ गायकवाड, मुळे, अनिल गावंडे, गजानन मानखैर, गिरीश जोशी आदी उपस्थित होते. यावेळी परिसरातील गावकर्यांची उपस् िथती होती.