अकोल्याचे ५२ खेळाडू ठरले राष्ट्रीय क्रीडा शिष्यवृत्तीस पात्र

By admin | Published: March 27, 2015 01:27 AM2015-03-27T01:27:14+5:302015-03-27T01:27:14+5:30

विविध राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत प्रावीण्य प्राप्त करणा-या खेळाडूंचा समावेश.

52 sportspersons of Akola were eligible for the National Sports Scholarship | अकोल्याचे ५२ खेळाडू ठरले राष्ट्रीय क्रीडा शिष्यवृत्तीस पात्र

अकोल्याचे ५२ खेळाडू ठरले राष्ट्रीय क्रीडा शिष्यवृत्तीस पात्र

Next

अकोला: भारतीय शालेय खेळ महासंघ, नवी दिल्लीच्या वतीने सन २0१३-१४ या वर्षात आयोजित विविध राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत प्रावीण्य प्राप्त करणार्‍या खेळाडू विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यासाठी अकोला जिल्ह्यातील ५२ खेळाडू क्रीडा शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणार्‍या खेळाडूला ११२५0, द्वितीय क्रमांक मिळविणार्‍या खेळाडूला ८९५0 आणि तृतीय क्रमांक प्राप्त करणार्‍या खेळाडूला ६७५0 आणि सहभाग घेणार्‍या खेळाडूला ३७५0 रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे ३0 मार्चपर्यंत आवश्यक कागदपत्र सादर केल्यानंतर, त्यांच्या बँकखात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा होणार आहे. पात्र ठरलेल्या खेळाडूंमध्ये वेदांत मुळे, प्रगती गोपनारायण, नेहा महामुने, आरती तिवारी, आशिष उगवेकर, कोमल गायकवाड, शंतनू पाटील, कल्याणी आगळे, रू पाली मानकर, मुक्ता सावरकर, आकाश गवारगुरू , कोमल इंगळे, दामिनी गजभिये, पूजा रहाटे, अजय अहिरे, चैतन्य भाला, राम मानकर, संकेत दारोकार, शुभम उपासे, संकेत तेलगोटे, निकिता अग्रवाल, दिया बचे, वैभव लांबोरे, अजय पेंदोर, शिवाजी गेडाम, विक्की जांगडे, तेजस हातवळणे, कांदबरी खापरे, श्रुतिका चाटी, समीक्षा नाईकनवरे, पूजा गावंडे, अपर्णा मानकर, शुभम मोठे, सचिन ठेंग, विशाल शिरसाट, सय्यद नावेद सय्यद नाजीम, अनुप्रिया गावंडे, सायली रोठे, निशा केवल, सनत दुबे, आयुषी मोहोकार, मो.शहाबुद्दीन मो.रफीक, आयुब भुरा जानीवाले, शहेजा सनाउल्लाखान, अफीक मो.सादीक, पूजा देऊळकर, अथर्व उप्पलवार, स्वरू प इंगोले, प्रणव आठवले, अक्षय बहेनवाल, सर्मपण गजभिये, हरिवंश टावरी या खेळाडूंचा समावेश आहे.

Web Title: 52 sportspersons of Akola were eligible for the National Sports Scholarship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.