५३ लाखांचा दंड वसूल!
By Admin | Published: February 20, 2016 02:35 AM2016-02-20T02:35:40+5:302016-02-20T02:35:40+5:30
रेतीचे अवैध उत्खनन तथा वाहतुक प्रकरण.
अकोला: जिल्हय़ात रेतीचे अवैध उत्खनन आणि वाहतुकीच्या प्रकरणांमध्ये गत दहा महिन्यांत जिल्हय़ात ५३ लाख ७६ हजार ५00 रुपयांचा दंड वसूल करण्याची कारवाई महसूल विभागामार्फत करण्यात आली.
रेतीचे अवैध उत्खनन आणि अवैध वाहतूक करणार्यांकडून महसूल विभागामार्फत दंड वसूल करण्यात येतो. रेतीच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीच्या प्रकरणांमध्ये यावर्षी जिल्हय़ासाठी १ कोटी ७३ लाख ८८ हजार रुपये दंड वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत गत एप्रिल २0१५ ते जानेवारी २0१६ अखेरपर्यंत जिल्हय़ातील सातही तालुक्यात रेतीचे अवैध उत्खनन आणि अवैध वाहतुकीच्या प्रकरणांमध्ये महसूल विभागामार्फत ५३ लाख ७६ हजार ५00 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रेतीचे अवैध उत्खनन आणि अवैध वाहतूक करणार्यांकडून महसूल विभागामार्फत ही दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. रेतीचे अवैध उत्खनन आणि अवैध वाहतुकीच्या प्रकरणांमध्ये दंड वसुलीचे उद्दिष्ट मार्च अखेर पूर्ण करण्यासाठी केवळ एक महिना दहा दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यानुषंगाने उद्दिष्टाच्या तुलनेत गत दहा महिन्यात महसूल विभागामार्फत वसूल करण्यात आलेल्या दंडाची रक्कम अत्यल्प आहे. त्यामुळे रेतीची अवैध वाहतूक आणि उत्खननाच्या प्रकरणांमध्ये दंड वसुलीचे महसूल विभागाचे उद्दिष्ट मार्च अखेर पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.