५३७ नव्याने पॉझिटिव्ह, सक्रिय रुग्णांचा आकडा ५,१८४ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:17 AM2021-03-15T04:17:36+5:302021-03-15T04:17:36+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १३०७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...

537 newly positive, active patients at 5,184 | ५३७ नव्याने पॉझिटिव्ह, सक्रिय रुग्णांचा आकडा ५,१८४ वर

५३७ नव्याने पॉझिटिव्ह, सक्रिय रुग्णांचा आकडा ५,१८४ वर

Next

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १३०७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ८३६ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मोठी उमरी येथील ४८, मूर्तिजापूर येथील २८, चोहट्टा बाजार येथील १५, लहान उमरी येथील १२, तेल्हारा व हिवरखेड येथील प्रत्येकी ११, खडकी व अकोली जहागीर येथील प्रत्येकी १०, खदान येथील नऊ, जठारपेठ व वैराट येथील प्रत्येकी आठ, वाडेगाव येथील सहा, रजपूतपुरा, आदर्श कॉलनी, कौलखेड, गुडधी व बाळापूर येथील प्रत्येकी पाच, खापरवाडा, पातूर, शास्त्रीनगर, सिंधी कॅम्प, रणपिसे नगर, डाबकी रोड व बोरगाव मंजू येथील प्रत्येकी चार, केशव नगर, गायत्री नगर, सांगळूद, अकोट, अकोट फैल, जीएमसी व मोझर येथील प्रत्येकी तीन, टेलीफोन कॉलनी, रामदासपेठ, भारती प्लॉट, जुने शहर, मासा, निमवाडी, शासकीय निरीक्षणगृह, आनंद नगर, शासकीय महिला राज्यगृह, न्यू तापडीया नगर, रिले, रामटेक व पीकेव्ही क्वॉर्टर येथील प्रत्येकी दोन, पळसो बढे, नायगाव, आगर, उगवा, सांगवी खुर्द, तापडीया नगर, निबंधे प्लॉट, गावंडगाव, माधव नगर, कासली खुर्द, मिर्झापूर, भगीरथ नगर, पिंपलोड, पांढूर्णा, शंकर नगर, बापू नगर, संतोष नगर, सूर्या गार्डन, हिंगणा फाटा, म्हाडा कॉलनी, झेडपी कॉलनी, ढेकर नगर, इंद्रा नगर, जवाहर नगर, ज्योती नगर, बाळापूर नाका, ज्ञानेश्वर नगर, शिवनगर, जोगळेकर प्लॉट, शिवचरण पेठ, खंडाळा, जयहिंद चौक, विद्या नगर, जीएमसी गर्ल्स होस्टल, दक्षता नगर, बाजोरिया हाऊस, सोळाशे प्लॉट, चैतन्य नगर, पंचशील नगर, शिवर, सोपीनाथ नगर, संता नगर, तारफैल, गुलजारपुरा, व्हीबीएच कॉलनी, राऊतवाडी, सुधीर कॉलनी, अकोली, हरिहर पेठ, मराठा नगर, मुकुंदवाडी, गौतम नगर, आळशी प्लॉट, भौरद, पंचशिल नगर, वाझेगाव, धानोरी, कावसा, सिसो, द्रावहा, उमरी नाका, विझोरा, शिवापूर, कॉग्रेस नगर, राम नगर, माळीपुरा, राजीव गांधी नगर व यशवंत नगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

सायंकाळी मूर्तिजापूर येथील १८, विवरा येथील १५, जितापूर ता.मूर्तिजापूर व पातूर येथील प्रत्येकी नऊ, खडकी येथील पाच, कौलखेड येथील चार, गोरक्षण रोड, जुने शहर, डाबकी रोड, मोठी उमरी येथील प्रत्येकी तीन, खोलेश्वर, जवाहर चौक, शिवाजी नगर, रामदासपेठ, शिवणी, जीएमसी, चतारी, लहान उमरी, कान्हेरी सरप, न्यु तापडीया नगर, तापडीया नगर व मलकापूर येथील प्रत्येकी दोन, मोहम्मद अली चौक, गोडबोले प्लॉट, खरप, रेणुका नगर, गड्डम प्लॉट, तारफैल, तोष्णीवाल लेआऊट, बजरंग चौक, कीर्ती कॉलनी, फिरदोस कॉलनी, केशव नगर, अगरवेस, बापू नगर, गुलजारपुरा, रजपूतपुरा, अंसर कॉलनी, वाशिम बायपास, कानशिवणी, साहू नगर, गायत्री नगर, गुरुदेव नगर, महाकाली नगर, हरिहर पेठ, बोरगाव, बाजोरिया लेआऊट, इद्रानगर, पारस, मोऱ्हळ, तामसी, सावरगाव, कृषी नगर, सहकार नगर, तुकाराम चौक, कोठारी वाटीका मागे व आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

दोन पुरुषांचा मृत्यू

अकोट तालुक्यातील करोडी येथील ६० वर्षीय पुरुषाचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना ११ रोजी दाखल करण्यात आले होते. शैलार फैल, अकोला येथील ७६ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यांना १२ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.

३८५ जणांना डिस्चार्ज

दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४३, बिहाडे हॉस्पिटल येथील सहा, आयकॉन हॉस्पिटल येथून आठ, नवजीवन हॉस्पिटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून पाच, सहारा हॉस्पिटल येथील एक, हॉटेल स्कायलार्क येथून सहा, हेंडज कोविड केअर सेंटर मूर्तिजापूर येथून दोन, कोविड केअर सेंटर पास्टूल अकोट येथून सहा, ओझोन हॉस्पिटल येथून आठ, आयुर्वेदिक रुग्णालयातून १६, आधार हॉस्पिटल मूर्तिजापूर, येथून दोन, अवघाते हॉस्पिटल येथून एक, तर होम आयसोलेशन येथील २८० अशा एकूण ३८५ जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला.

आतापर्यंत २१,५९९ कोरोनाबाधित

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २१,५९९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १६,०१३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४०१ जणांचा मृत्यू झाला असून सद्यस्थितीत ५,१८४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: 537 newly positive, active patients at 5,184

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.