अकोला जिल्ह्यातील ४९ गावांत पाणीटंचाई निवारणासाठी ५४ कामांना मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 03:23 PM2018-02-20T15:23:45+5:302018-02-20T15:25:56+5:30
अकोला : जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ४९ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ५४ कामांना प्रशासकीय मान्यता देत, मान्यता देण्यात आलेली पाणीटंचाई निवारणाची कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शनिवारी दिला.

जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांच्या कृती आराखड्यास जिल्हाधिकाºयांनी मंजुरी दिली आहे. कृती आराखड्यात समाविष्ट जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर व मूर्तिजापूर या सहा तालुक्यांतील ४९ गावांमध्ये २८ विंधन विहिरी व २६ कूपनलिका, अशा ५४ उपाययोजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शनिवार, १७ फेबु्रवारी रोजी दिला. प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली ७१ लाख रुपयांची पाणीटंचाई निवारणाची कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करून संबंधित गावांमध्ये पाणीटंचाई भासणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचा आदेशही जिल्हाधिकाºयांनी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागासह संबंधित यंत्रणांना दिला.