कोरोना उपाययोजनांचा खर्च भागविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून मिळणार ५५ कोटी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:16 AM2021-04-26T04:16:23+5:302021-04-26T04:16:23+5:30
अकोला : शासन निर्णयानुसार कोरोना उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेचा ३३ टक्के निधी देण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील कोरोना ...
अकोला : शासन निर्णयानुसार कोरोना उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेचा ३३ टक्के निधी देण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजनांचा खर्च भागविण्याकरिता जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून ५५ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयामार्फत नियोजन सुरू करण्यात आले असून, लवकरच निधी उपलब्ध होणार आहे.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, राज्यात शासनामार्फत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, कोरोनाचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत मंजूर निधीच्या ३३ टक्के निधी कोरोना उपाययोजनांसाठी देण्याचा निर्णय शासनाच्या नियोजन विभागामार्फत १२ एप्रिल रोजी घेण्यात आला. त्यानुसार कोरोना उपाययोजनांचा खर्च भागविण्यासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेचा ३३ टक्के निधी देण्यात येणार आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत १८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, त्यापैकी ३३ टक्के म्हणजेच ५५ कोटी रुपयांचा निधी कोरोना उपाययोजनांचा खर्च भागविण्यासाठी देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून ५५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयाने सुरू केले असून, जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेचा निधी लवकरच उपलब्ध होणार आहे.
विकासकामांचे ५५ कोटी होणार कमी!
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत २०२१-२२ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात विविध योजना आणि विकासकामांसाठी १८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनेच्या मंजूर निधीतून ३३ टक्के (५५ कोटी रुपये) निधी कोरोना उपाययोजनांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत जिल्ह्यातील विकासकामांचा ५५ कोटी रुपयांचा निधी कमी होणार आहे.
शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत मंजूर निधीपैकी ३३ टक्के निधी कोरोना उपाययोजनांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर १८५ कोटी रुपयांच्या निधीतून ५५ कोटी रुपयांचा निधी कोरोना उपाययोजनांसाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.
गिरीश शास्त्री
जिल्हा नियोजन अधिकारी