प्रस्ताव आॅनलाईन न झाल्याने ५५४ लाभार्थी अनुदानापासून वंचित !

By admin | Published: March 4, 2017 04:17 PM2017-03-04T16:17:28+5:302017-03-04T16:17:28+5:30

१४४४ प्रस्ताव आॅनलाईन झाल्याने उर्वरीत ५५४ प्रस्तावांना आॅनलाईन व अनुदानाची प्र्रतीक्षा आहे.

554 beneficiaries are denied subsidy due to lack of proposal online! | प्रस्ताव आॅनलाईन न झाल्याने ५५४ लाभार्थी अनुदानापासून वंचित !

प्रस्ताव आॅनलाईन न झाल्याने ५५४ लाभार्थी अनुदानापासून वंचित !

Next

कोंडाळा महाली (वाशिम) - वाशिम तालुक्यात इंदिरा आवास घरकुल योजनेच्या एकूण १९९८ लाभार्थींना आॅफलाईन मंजूरात दिली होती. यापैकी १४४४ प्रस्ताव आॅनलाईन झाल्याने उर्वरीत ५५४ प्रस्तावांना आॅनलाईन व अनुदानाची प्र्रतीक्षा आहे.
वाशिम तालुक्यातील ग्रामीण भागात इंदिरा आवास घरकुल योजनेंतर्गत सन २०१५-१६ या सत्रात लाभार्थींकडून प्रस्ताव बोलाविले होते. एकूण १९९८ लाभार्थींना आॅफलाईन मंजूरात दिली होती. यापैकी १४४४ प्रस्ताव आॅनलाईन झाल्याने या लाभार्थींना घरकुल अनुदानाचा पहिला हप्ता देण्यात आला. ५५४ प्रस्ताव ३१ मार्च २०१६ पूर्वी आॅनलाईन न झाल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य चक्रधर गोटे यांनीदेखील स्थायी समितीच्या सभेत प्रश्न उपस्थित केला होता. यावर संबंधित कर्मचारी-अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आश्वासन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांनी दिले होते. आॅनलाईन मंजूरात मिळाली नसल्याने ५५४ लाभार्थींना अनुदान मिळणार की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यासंदर्भात पंचायत समितीचे सहायक अभियंता जी.यू. धुतमल म्हणाले की, आॅफलाईन मंजूरात मिळालेले; परंतू आॅनलाईन मंजूरात न मिळालेल्या लाभार्थींची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मागितली असून, माहिती पाठविली आहे.

Web Title: 554 beneficiaries are denied subsidy due to lack of proposal online!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.