कोरोनाच्या दाेन वर्षांत ५६ मुली बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:21 AM2021-09-23T04:21:50+5:302021-09-23T04:21:50+5:30
९२ टक्के मुलींचा शोध अकाेला जिल्ह्यातून पळून गेलेल्या किंवा बेपत्ता झालेल्या मुलींपैकी ९२ टक्के मुलींचा शोध लागला असून, त्या ...
९२ टक्के मुलींचा शोध
अकाेला जिल्ह्यातून पळून गेलेल्या किंवा बेपत्ता झालेल्या मुलींपैकी ९२ टक्के मुलींचा शोध लागला असून, त्या आपल्या घरी परतल्या आहेत, तर आठटक्के मुली बेपत्ता असून, त्यांनी विवाह करून त्या नवऱ्याकडे सेटल झाल्याची माहिती आहे़ शासनाने राबविलेल्या ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातूनच मुलींना शोधण्यात यश आले आहे.
जिल्ह्यातील एकूण बेपत्ता - ५६
मुले व पुरुष : २०
मुली व महिला : ३६
वाढत चालली विधिसंघर्षीत बालकांची संख्या
अकाेला शहर व जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे १८ वर्षांखालील बालके, चोरी, दरोडे, मारामाऱ्या, विनयभंग, खून अशा गंभीर गुन्ह्यात अडकले आहेत. अल्पवयीन बालकांना योग्य संस्कार न मिळाल्याने मित्रांच्या मदतीने ते गंभीर गुन्ह्यात शिरकाव करीत आहेत.
मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक
अल्पवयीन मुले आणि मुली यांच्यात बेपत्ता होणे, तसेच पळून जाण्याच्या प्रकारात सर्वाधिक गुन्हे हे मुलींचे दाखल होतात. यामध्ये अपहरणाचा गुन्हा नोंद होतो. पोलीस दलातील आकडेवारीवरून हे दिसून येते. पोलिसांच्या विविध शाखांकडून यात दिरंगाई न करता मुला-मुलींचा शोध घेतला जातो.