रेस्टॉरंटमध्ये ५.६२ लाखांची वीजचोरी उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:20 AM2021-08-29T04:20:32+5:302021-08-29T04:20:32+5:30
वाजेदा परवीन वाहिद खान आणि वाहिद खान वाजीद खान अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. वाजेदा परवीन वाहिद ...
वाजेदा परवीन वाहिद खान आणि वाहिद खान वाजीद खान अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. वाजेदा परवीन वाहिद खान आणि वाहिद खान वाजीद खान यांच्या मालकीचे वेलकम रेस्टॉरंट आहे. या ठिकाणी रेस्टॉरंट मालकाने महावितरणच्या न कळत बस बारवरून आकडा टाकून अवैधरीत्या वीजपुरवठा घेतला होता. दोन दिवसांपूर्वी महावितरणचे सहायक अभियंता विनायक शेळके हे या परिसरात पाहणी करीत असताना, आकडा टाकून वीजचोरी होत असल्याची बाब निदर्शनास आली. महावितरणकडून याचा पंचनामा करण्यात आला. रेस्टॉरंट चालकाने एकूण २६,१०० युनिटची वीजचोरी केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी महावितरणकडून मालकास ५ लाख ६२हजार २१० रुपयांचे देयक देण्यात आले, पण रेस्टॉरंट चालकाने विहीत कालावधीत सदर रकमेचा भरणा न केल्याने महावितरण कडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. महावितरणकडून दाखल तक्रारीची दखल घेऊन अकोटफैल पोलिसांनी घेत, वाजेदा परवीन वाहिद खान आणि वाहिद खान वाजीद खान यांच्या विरोधात भारतीय वीज कायदा २००३, सुधारित कायदा २००७ मधील कलम १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. वीजचोरी अजामीनपात्र, तसेच दखलपात्र गुन्हा आहे.