विदर्भात २८ दिवसांत वीज ग्राहकांकडून ५७६ कोटींचा भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:13 AM2021-06-30T04:13:17+5:302021-06-30T04:13:17+5:30

नागपूर परिक्षेत्रात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि कृषी ग्राहकांकडील महावितरणची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्राहकांकडील वीज बिलाची ...

576 crore payment from electricity consumers in 28 days in Vidarbha | विदर्भात २८ दिवसांत वीज ग्राहकांकडून ५७६ कोटींचा भरणा

विदर्भात २८ दिवसांत वीज ग्राहकांकडून ५७६ कोटींचा भरणा

Next

नागपूर परिक्षेत्रात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि कृषी ग्राहकांकडील महावितरणची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्राहकांकडील वीज बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या निर्देशनात या महिन्याच्या सुरुवातीपासूनच व्यापक मोहीम संपूर्ण विदर्भात राबविण्यात येत आहे. या मोहिमेला अधिक गती देण्यासाठी स्वतः प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी अकोला, अमरावती व नागपूर परिमंडला आढावा बैठकी घेतल्या. अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नामुळे महावितरणच्या थकबाकी वसुली मोहिमेत १ जून ते २८ जून या दरम्यान नागपूर परिक्षेत्रात थकबाकीदार ग्राहकांनी सुमारे ५७६ कोटी रुपयांच्या वीज बिलांचा भरणा केला. उर्वरित ग्राहकांनी वीज बिलाची थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी केले आहे.

परिमंडळनिहाय असा झाला भरणा

परिमंडळ देयक भरणा (कोटीमध्ये)

नागपूर २५४

अमरावती १०५

अकोला ९१

चंद्रपूर ७०

गोंदिया ५६

००००००००००००००००००००

एकूण ५७६

Web Title: 576 crore payment from electricity consumers in 28 days in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.