५८७ केंद्रांवर होणार महापालिकेसाठी मतदान!

By admin | Published: February 7, 2017 03:19 AM2017-02-07T03:19:04+5:302017-02-07T03:25:57+5:30

अकोला मनपा निवडणूकीसाठी कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट देणार उपलब्ध करून

587 polling stations will be held for municipal corporation! | ५८७ केंद्रांवर होणार महापालिकेसाठी मतदान!

५८७ केंद्रांवर होणार महापालिकेसाठी मतदान!

Next

अकोला, दि. ६-महापालिकेच्या महासंग्रामासाठी राजकीय पक्षांप्रमाणेच मनपाची प्रशासकीय यंत्रणादेखील सज्ज झाली आहे. मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी प्रशासनाने ५८७ मतदान केंद्रांची निश्‍चिती केली असून केंद्रांची संख्या लक्षात घेता संबंधित अधिकारी-कर्मचार्‍यांना कंट्रोल युनिट, बॅलेट युनिटसह इतर साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी मनपाची प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. २१ फेब्रुवारी रोजी मतदानाची प्रक्रिया होणार असून २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडेल. निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी मतदान केंद्र निश्‍चित करण्याची जबाबदारी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर यांच्याकडे सो पवली.
मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेली मतदान केंद्रांची शोध मोहीम तूर्तास थांबली आहे. महापालिका क्षेत्राची हद्दवाढ होऊन शहरालगतच्या गावांचा मनपात समावेश झाला. त्यामुळे लोकसंख्या वाढीसह भौगोलिक क्षेत्रफळातही वाढ झाली.
प्रभाग पुनर्रचना केली असता २0 प्रभागांची निर्मिती झाली असून ८0 सदस्यांना निवडून द्यावे लागणार आहे. अर्थातच, या सर्व बाबी लक्षात घेता मतदान केंद्रांसाठी मनपात समाविष्ट झालेल्या नवीन भागासह महापालिकेच्या मराठी, उर्दू, हिंदी शाळा, शहरातील जिल्हा परिषद शाळा, विद्यालये, खासगी कॉन्व्हेंटमधील वर्ग खोल्यांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सद्यस्थितीत ५८७ मतदान केंद्रे निश्‍चित करण्यात आले असून एका मतदान केंद्रावर ८00 ते ८५0 मतदार मतदानाचा हक्क बजावतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

बुधवारी यादी होईल प्रसिद्ध
उमेदवारी अर्ज मागे घेणार्‍या उमेदवारांना ७ फेब्रुवारीपर्यंंंत अवधी दिला आहे. निवडणुकीत कायम राहणार्‍या उमेदवारांची अंतिम यादी ८ फेब्रुवारी (बुधवारी) रोजी प्रसिद्ध केली जाईल. याच दिवशी मनपात तसेच मनपाच्या वेबसाइटवर मतदान केंद्रांच्या यादीसह मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

संवेदनशील मतदान केंद्रांची यादी तयार
महापालिका प्रशासनाने मतदान केंद्रांची यादी पोलीस प्रशासनाकडे सोपवली आहे. पोलिसांनी संवेदनशील मतदान केंद्रांची वेगळी यादी तयार केली असून त्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणा त बंदोबस्त तैनात करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. यामध्ये प्रामुख्याने जुने शहरातील पोळा चौक, तसेच बाळापूर रोडवरील मनपा उर्दू मुलांची शाळा, डाबकी रोडवरील आंबेडकर मैदानालगतची उर्दू मुलांची शाळा क्रमांक १0 आदींसह अकोला पश्‍चिम विभागातील बहुतांश शाळांचा समावेश आहे.

Web Title: 587 polling stations will be held for municipal corporation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.