सिरसो गावची कथाच न्यारी; ६ झाले जिल्हाधिकारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2021 05:24 PM2021-08-16T17:24:06+5:302021-08-16T17:26:16+5:30

Murtijapur News : ६ जिल्हाधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रात उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कर्तव्य बजावणारे नागरिक घडविले.

6 became Collector from Sirso village | सिरसो गावची कथाच न्यारी; ६ झाले जिल्हाधिकारी!

सिरसो गावची कथाच न्यारी; ६ झाले जिल्हाधिकारी!

googlenewsNext

- संजय उमक
मूर्तिजापूर : तालुक्यातील शहराला लागूनच असलेले किमान दहा हजार लोकसंख्या असलेले सिरसो हे गाव, आता पर्यंत या गावाने ६ जिल्हाधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रात उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कर्तव्य बजावणारे नागरिक घडविले. आतापर्यंत एवढे जिल्हाधिकारी होणारे एकही गाव या विभागात सापडणे अवघडच आहे. एवढेच नव्हे तर सद्यस्थितीत विविध क्षेत्रात अधिकारी म्हणून अनेक जण आपले कर्तव्य बजावत आहेत. 
           मुख्य गाव मूर्तिजापूर पासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर, या गावात प्राथमिक शिक्षणासाठी केवळ सातवी पर्यंत जिल्हा परिषद शाळा, बहूदा सर्वच उच्च विभूतांनी याच शाळेत प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवले त्यानंतरचे माध्यमिक शिक्षणासाठी मूर्तिजापूर येथे जावे लागत असे शहरातही माध्यमिक शिक्षणासाठी बोटावर मोजण्याइतक्याच शाळा होत्या त्यातही गाडगे महाराज विद्यालय प्रसिद्ध असल्याने तिथेच प्रवेश मिळवायचे त्यानंतर याच शाळेची शाखा असलेल्या महाविद्यालयीन शिक्षण घ्यावे लागे, पूर्वीच्या काळात वाहनाची कुठलीही सोय नसल्याने रोज सिरसो येथून कितीतरी विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी सहा किलोमीटर जाणे आणि संध्याकाळी परत येणे अशी बारा किलोमीटरची पायपीट करावी लागत असे अशा परिस्थितीतही या गावचे विद्यार्थी घडले आणि आता पर्यंत या गावाने ७ जिल्हाधिकारी, ४ तहसीलदार, ३ गटविकास अधिकारी, दिलेल एवढेच नव्हे तर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती संजय उर्फ बाळासाहेब मेहरे याच गावचे आहेत, त्याच बरोबर डॉ. रविंद्र खंडारे हे केंद्र शासनाच्या नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आहेत, प्रा. डॉ. श्याम खंडारे पदवी पदव्युत्तर समाजशास्त्र विभाग प्रमुख आहेत, डॉ. भगवान ढाकरे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात प्राध्यापक आहेत, पुजा माटोडे (हरणे) या घाटंजी येथे तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत, ओंकार गाठेकर हे गटविकास अधिकारी, अभिजित बन्नोरे सहायक गटविकास अधिकारी, डॉ. नरेंद्र हरणे हे प्राचार्य, डॉ. जुगल मालधुरे हे प्राध्यापक, शंकर विसळ अभियंता, किरण विसळ अभियंता, सुमेद खिराळे प्रशासकीय अधिकारी, डाॅ. स्वाती गवई, राहूल खंडारे राज्यकर सहायक स्टेट टॅक्स असिस्टंट, राधिका देशमुख प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आता पर्यंत या गावाने ७४ अधिकारी,  दिले असून सद्यस्थितीत ७८ एवढे अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. याच बरोबर स्वातंत्र्य सैनिक, साहित्यिक, सैनिक, स्वातंत्र्य सैनिक, शिक्षक, वकील, डॉक्टर असे समाजसेवी व्रतस्थ या गावातून घडले आहे. शासकिय सेवेत आतापर्यंत २०७ लोकांनी आपले कर्तव्य बजावले आहे. याच धर्तीवर 'सिरसोचे मातब्बर' विजय हरणे संपादित एक पुस्तकही प्रकाशित करण्यात आले असून या पुस्तकात कर्मचारी ते जिल्हाधिकारी व पदाधिकारी यांचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे.
 
हे झाले जिल्हाधिकारी, तहसीलदार 
भगवंतराव देशमुख (जिल्हाधिकारी), जयवंतराव देशमुख (जिल्हाधिकारी), राजाभाऊ देशमुख(जिल्हाधिकारी), बलदेवसिंह हरणे (निवासी उपजिल्हाधिकारी) , पंजाबराव वानखडे (अप्पर जिल्हाधिकारी), दिनेशचं वानखडे (अप्पर जिल्हाधिकारी), गणपतराव मेहरे (तहसीलदार), पुजा माटोडे(हरणे)(तहसीलदार), मुकुंदराव अंबाडे (तहसीलदार), देवराव इंगळे(तहसीलदार)
 
कलेक्टरचे गाव, ही वेगळी ओळख
सिरसो या गावात आतापर्यंत वेगवेगळ्या विभागात अनेक अधिकारी घडले आहेत परंतु एकेकाळी या गावाने वेगळी ओळख निर्माण केली, आतापर्यंत ६ जिल्हाधिकारी या गावाने दिल्याने कलेक्टरचे गाव म्हणून या पंचक्रोशीतील ओळखल्या जायचे, ही ओळख आजही कायम आहे.

Web Title: 6 became Collector from Sirso village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.