शेतकऱ्यांना मदत वाटपाचे ६० कोटी प्रलंबित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 12:36 PM2020-01-18T12:36:12+5:302020-01-18T12:36:21+5:30

मदत वाटपासाठी प्रलंबित ६० कोटी रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १३ जानेवारी रोजी शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

6 crore pending allocation of aid to farmers! | शेतकऱ्यांना मदत वाटपाचे ६० कोटी प्रलंबित!

शेतकऱ्यांना मदत वाटपाचे ६० कोटी प्रलंबित!

Next

अकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत वाटप करण्यासाठी तिसºया टप्प्यातील ६० कोटींची रक्कम अद्याप शासनाकडून प्राप्त झाली नाही. त्यानुषंगाने शेतकºयांना मदत वाटपासाठी प्रलंबित ६० कोटी रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १३ जानेवारी रोजी शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचे ३ लाख ६९ हजार ७१९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी ८ हजार रुपये आणि फळ पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत शासनामार्फत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार शेतकºयांना मदत वाटप करण्याच्या पहिल्या व दुसºया टप्प्यात १३ डिसेंबरपर्यंत २३१ कोटी १० लाख ५८ हजार रुपयांची मदत शासनाकडून प्राप्त झाली. उपलब्ध मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मदत वाटपाच्या तिसºया टप्प्यातील उर्वरित ६० कोटी रुपयांची मदत मात्र अद्याप शासनाकडून प्राप्त झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत वाटप करण्यासाठी तिसºया टप्प्यातील प्रलंबित ६० कोटी रुपयांच्या मदत निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी तिसºया टप्प्यातील ६० कोटी रुपयांची मदत निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मदतीची रक्कम लवकरच शासनाकडून प्राप्त होणार आहे.
-संजय खडसे,
निवासी उपजिल्हाधिकारी.

 

Web Title: 6 crore pending allocation of aid to farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.