आझाद हिंद एक्स्प्रेसच्या ६, तर ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसच्या ४ फेऱ्या रद्द

By Atul.jaiswal | Published: June 22, 2024 03:24 PM2024-06-22T15:24:19+5:302024-06-22T15:25:26+5:30

बिलासपूर विभागात २४ ते ३० जूनपर्यंत ब्लॉक, सहा रेल्वे परिवर्तीत मार्गाने धावणार

6 trips of Azad Hind Express and 4 trips of Dnyaneswari Express have been cancelled | आझाद हिंद एक्स्प्रेसच्या ६, तर ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसच्या ४ फेऱ्या रद्द

आझाद हिंद एक्स्प्रेसच्या ६, तर ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसच्या ४ फेऱ्या रद्द

अकोला : दक्षीण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागातील कोतरलिया रेल्वे स्थानकाजवळ २४ ते ३० जून दरम्यान प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंगचे काम केले जाणार आहे. या तांत्रिक कामाकरिता विविध तारखांना १६ एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर ६ एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. यामध्ये अकोला मार्गे धावणाऱ्या आझाद हिंद व ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसच्या अनुक्रमे ६ व ४ फेऱ्या रद्द करण्यात आल्याने अकोलेकर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

रेल्वेतील सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, १२१३० हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस २५ ते ३० जूनपर्यंत प्रस्थान स्थानकावरून रद्द करण्यात आली आहे. १२१२९ पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस २७ जून ते २ जुलै या कालावधीत प्रस्थान स्थानकावरून रद्द करण्यात आली आहे. १२१०१ एलटीटी-शालिमार ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस २४, २५, २८ आणि २९ जून रोजी, तर १२१०२ शालिमार-एलटीटी ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस २६, २७, ३० जून आणि १ जुलै रोजी त्यांच्या प्रस्थान स्थानकावरूनच रद्द करण्यात आल्या आहेत. २०८२२ संत्रागाछी-पुणे हमसफर एक्स्प्रेस २९ जून रोजी, तर २०८२१ पुणे-संत्रागाछी हमसफर एक्स्प्रेस १ जुलै रोजी रद्द करण्यात आल्या आहेत. तथापी, या रेल्वेला अकोला स्थानकावर थांबा नसल्याने अकोलेकरांना त्याचा परिणाम जाणवणार नाही.

Web Title: 6 trips of Azad Hind Express and 4 trips of Dnyaneswari Express have been cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला