६0 गॅस सिलिंडर प्रकरणात केवळ चौकशीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 01:18 PM2019-02-23T13:18:10+5:302019-02-23T13:18:14+5:30
अकोला: पोलीस पथक आणि पुरवठा विभागाने गुरुवारी रात्री टाकलेल्या छाप्यात गीता नगरातील क ॅटरर्स व्यावसायिक संजय सिसोदिया याच्या गोदामात तब्बल ६0 गॅस सिलिंडर आढळून आले; परंतु हे जप्त करण्यात आले नाहीत. व्यावसायिक गॅस सिलिंडर असल्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण पुरवठा विभागाकडे सुपूर्द केले.
अकोला: पोलीस पथक आणि पुरवठा विभागाने गुरुवारी रात्री टाकलेल्या छाप्यात गीता नगरातील क ॅटरर्स व्यावसायिक संजय सिसोदिया याच्या गोदामात तब्बल ६0 गॅस सिलिंडर आढळून आले; परंतु हे जप्त करण्यात आले नाहीत. व्यावसायिक गॅस सिलिंडर असल्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण पुरवठा विभागाकडे सुपूर्द केले. या गॅस सिलिंडर साठ्याची चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे; परंतु एवढ्या मोठा सिलिंडरचा साठा ठेवण्याची परवानगी या व्यावसायिकाला दिली कोणी, ६0 गॅस सिलिंडर वापरण्याची परवानगी आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहर पोलीस उपअधीक्षकांच्या विशेष पथकासह पुरवठा विभागाने गीता नगरातील संजय सिसोदिया याच्या गोदामात छापा टाकला असता, त्याच्या गोदामात एक नव्हे, तर दोन कंपनीचे तब्बल ६0 गॅस सिलिंडर आढळून आले. सिलिंडर घरगुती नसून, व्यावसायिक असल्यामुळे पोलीस विभागाने कारवाईचे अधिकार पुरवठा विभागाच्या अधिकाºयांना दिले; परंतु पुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी गॅस सिलिंडर जप्त करणे अपेक्षित असतानाही ते जप्त केले नाहीत. कारवाईदरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडर बाळगण्याची परवानगी त्याच्याकडे आहे का, गोदामात अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नसतानाही एवढा मोठा सिलिंडर साठा ठेवला कसा, या प्रश्नांची उकलसुद्धा झाली नाही. उलट पुरवठा विभागाने दोन्ही गॅस कंपनीच्या अधिकाºयांना पत्र पाठवून खुलासा मागविला आहे. पुरवठादाराला एखाद्या व्यावसायिकाला एवढे गॅस सिलिंडर उपलब्ध करून देता येऊ शकतात. किती सिलिंडर ठेवतात येतात, आदी प्रश्नांची उत्तरे अनुत्तरितच आहेत. गॅस कंपन्यांकडून खुलासा आल्यानंतर आम्ही पुढील कारवाई करू, असे पुरवठा विभागाच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे.
गुरुवारी केलेल्या कारवाईदरम्यान गोदामात ६0 गॅस सिलिंडर आढळून आलेत. हे व्यावसायिक सिलिंडर असल्यामुळे, एवढे सिलिंडर बाळगता येतात का, संबंधित व्यावसायिकाचा किती सिलिंडरचा कोटा ठरलेला आहे, याची माहिती कंपनीकडून मागविण्यात येत आहे. त्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल.
-अजय तेलगोटे, निरीक्षण अधिकारी.
पुरवठा विभाग.