६0 पैकी दोनच उमेदवारांना पुन्हा संधी!

By admin | Published: February 24, 2017 02:13 AM2017-02-24T02:13:26+5:302017-02-24T02:13:26+5:30

कुणाचे पती, तर कुणाची पत्नी झाली विजयी

60 out of 60 candidates again! | ६0 पैकी दोनच उमेदवारांना पुन्हा संधी!

६0 पैकी दोनच उमेदवारांना पुन्हा संधी!

Next

खामगाव, दि. २३- घाटाखालील सहा तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेचे २५ गट आहेत. यापैकी तीन जागांवर मतदारांनी विद्यमान उमेदवारांना संधी दिली आहे.
यामध्ये मलकापूर तालुक्यातून भारतीय जनता पक्षाच्या उमाताई शिवचंद्र तायडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगलाताई संतोष रायपुरे, नांदुरा तालुक्यातील संतोष गुलाबराव पाटील यांना उमेदवारांनी पुन्हा संधी दिली आहे. त्याचवेळी ऐनवेळी शिवसेनेतून भाजपमध्ये दाखल झालेल्या मालुताई ज्ञानदेवराव मानकर यांनाही मतदारांनी संधी दिली असून, मलकापूर येथील उमाताई शिवचंद्र तायडे या आधी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व करीत होत्या. मात्र, आता त्या जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. शेगाव तालुक्यातील भारिप-बहुजन महासंघाचे राजाभाऊ भोजने यांना पंचायत समितीमधून जिल्हा परिषदेत बढती मिळाली आहे. पंचायत समिती सदस्य असलेले राजाभाऊ भोजने आता थेट जिल्हा परिषद सदस्य झाले आहेत, तर घाटावर कोणलाच पुन्हा संधी मिळाली नसल्याचे दिसून येते.

Web Title: 60 out of 60 candidates again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.