काळाला रोखून वाचविले ६0 जणांचे प्राण !

By admin | Published: August 5, 2015 10:52 PM2015-08-05T22:52:50+5:302015-08-05T22:52:50+5:30

दोन प्रवाशंचे प्रसंगावधान; सर्व प्रवासी सुखरूप.

60 survivors save lives! | काळाला रोखून वाचविले ६0 जणांचे प्राण !

काळाला रोखून वाचविले ६0 जणांचे प्राण !

Next

शेगाव (जि. बुलडाणा) : काळ आला होता; पण वेळ आली नव्हती.. या उक्तीचा प्रत्यय एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणार्‍या ६0 प्रवाशांना रविवारी रात्री बोथा घाटात आला. एखाद्या चित्रपटातील स्टंट सीन भासावा, असे हे थरारक नाट्य बोथा घाटात रविवारी रात्री १२ वाजेच्या दरम्यान घडले. बोथा घाट चालकांसाठी आव्हानच असतो. रविवारी रात्री परतवाडा- बुलडाणा ही बुलडाणा आगाराची बस ही घाट चढत असताना अचानक बंद पडली. उतारावरून बस मागे येत असताना बसमधील प्रमोद पोहरे आणि गोपाल शर्मा या दोन प्रवाशांनी प्रसंगावधान राखून बसमधून उड्या घेतल्या आणि रस्त्याच्या कडेला असलेली मोठ मोठी दगड उचलून बसच्या चाकांना लावली. यामुळे बस रोखली गेली व मोठा अनर्थ टळला. वाहकासोबतच या दोन प्रवाश्यांनी दाखविलेल्या धाडसाने बसमधील सर्व प्रवासी सुखरुप बचावले. अन थरकाप उडाला ! उतरामुळे बस घाटात कोसळते की या भीतीने प्रवाशांचा थरकाप उडाला होता. मात्र दोन्ही प्रवाशांच्या प्रसंगावधानाने सर्वांचे जीव भांड्यात पडले. यावेळी २८ सप्टेंबर २0१२ रोजी अशाच नादुरुस्त बसमुळे शेगाव-पातुर्डा मार्गावरील पूर्णा नदीच्या पुलावरझालेल्या झालेल्या बस दुर्घटनेत १९ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. प्रसंगावधान राखून प्रवाशांचे जीव वाचविल्याबद्दल दोन्ही प्रवाशांचे अभिनंदन होत आहे.

Web Title: 60 survivors save lives!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.