‘एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षेत ६0८ विद्यार्थी उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 01:12 PM2019-02-06T13:12:39+5:302019-02-06T13:12:47+5:30
अकोला: केंद्र शासनाच्यावतीने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संधी मिळावी, या उद्देशाने ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचा निकाला १ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला.
अकोला: केंद्र शासनाच्यावतीने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संधी मिळावी, या उद्देशाने ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचा निकाला १ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेमध्ये १७६४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी केवळ ६0८ विद्यार्थ्यांनीच यश मिळविले. विविध संवर्गातील केवळ सहा विद्यार्थ्यांनी प्रावीण्य श्रेणी प्राप्त केली. प्रशांत सोनटक्के याने ११३ गुण मिळवित पहिला क्रमांक पटकावला, तर मुलींमधून शिवाणी पाचपोर हिने १0५ गुण मिळवित प्रथम क्रमांक मिळविला.
ज्या पालकांचे उत्पन्न दीड लाख रुपयांच्या आत आहे, अशा सर्व आठवीच्या विद्यार्थ्यांना ‘एनएमएमएस’ परीक्षा देता येते. एनएमएमएस परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांला आठवी ते बारावीपर्यंत वर्षाला १२ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्याला प्रत्येक वर्गाची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण करावी लागते. गतवर्षी जिल्ह्यातून एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी ३५0 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. यंदा मात्र त्यात वाढ झाली आहे. परीक्षेमध्ये खुल्या प्रवर्गात अकोट येथील भाऊसाहेब पोटे विद्यालयाचा प्रशांत सोनटक्के याने ११३ गुण, लक्ष्मीबाई गणगणे विद्यालयाचा पवन रेवस्कार याने १0६ गुण, जि. प. शाळा हिवरखेडचा विनायक टाले, महाराष्ट्र माध्य. शाळेची शिवाणी पाचपोर यांनी १0५ गुण, सरस्वती विद्यालय अकोटची पूजा तराळे हिने १00 तर भोपळे विद्यालयाची रूपल वालचाळे, माँ शारदा ज्ञानपीठचा ओम अरबट, लक्ष्मीबाई गणगणे विद्यालयाचा रामेश्वर बेरड यांनी अनुक्रमे ९९ गुण मिळविले. एससी प्रवर्गात श्रुती माणिक हिने ७५, साक्षी सुरडकर हिने ७४, ऋतुजा बनसोडे हिने ७३, अंकिता वानखडे हिने ७३, वैभव लोने ७२, रोहित पटके ७१, सूरज भारसाकळे ७१ खुशी काकडे ७0, एसटी प्रवर्गात प्रथमेश चव्हाण ६७ गुण, अभय पांडे ६७, शुभम चाफे ६६, आदित्य तराम ६५, कृतिका पवार ६२, पायल सोळंके ५९, व्हिजेमधून शेख मुशाद शेख अलिमोद्दीनने ६९, अंकुश पजई ६३, विनय राठोड ६२, विवेक पवार ६१, एनटीमधून आदेश चानेकर ७३, पूर्वेश थिटे ७१, भावना तुमदेकर ७१, आरती धारपवार ७0, ऋतुजा भोंडे ७0, एनटी सीमधून आदित्य साबे ७४, सौरभ हेकड ७४, साक्षी पोळे ७२, समीक्षा घाटोळ ६८, आंचल गावंडे, सोहम पाठक ६६, प्रीती बावनीकर ६५ आदी विद्यार्थी उत्तीर्ण झाले. (प्रतिनिधी)